शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

२०० शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:37 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या नियंत्रणात १४ तालुक्यांत ग्रामीण भागात सुमारे १६०० शाळा आहेत. यात २०० शाळांच्या वर्गखोल्या काही वर्षांपासून धोकादायक स्थितीत आहेत. अशा शिकस्त वर्गखोल्यांतूनच आजही विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. गत आठवड्यात भातकुली तालुक्यातील आष्टी येथे शाळेत भिंत पडून इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर तीन विद्यार्थी जखमी झाले होते. त्यामुळे शिकस्त वर्गखोल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देचिमुकले धोक्यात : जि.प.ला केव्हा येणार जाग; बांधकाम, दुरुस्तीची प्रतीक्षा

जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या नियंत्रणात १४ तालुक्यांत ग्रामीण भागात सुमारे १६०० शाळा आहेत. यात २०० शाळांच्या वर्गखोल्या काही वर्षांपासून धोकादायक स्थितीत आहेत. अशा शिकस्त वर्गखोल्यांतूनच आजही विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. गत आठवड्यात भातकुली तालुक्यातील आष्टी येथे शाळेत भिंत पडून इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर तीन विद्यार्थी जखमी झाले होते. त्यामुळे शिकस्त वर्गखोल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शासन गरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देता यावे, यासाठी विविध उपक्रम राबविते. मराठीसह इंग्रजी माध्यमाचे शिक्षण आणि डिजिटल वर्गखोल्या निर्मितीकडे भर आहे. असे असताना जिल्हा परिषदेच्या एक-दोन नव्हे, तर तब्बल २०० शाळांच्या वर्गखोल्यांची स्थिती भयावह झाली आहे. काही शाळांचे छत कधी कोसळेल, हे सांगता येत नसल्याची माहिती एका मुख्याध्यापकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती काय करते, असा सवाल त्यानिमित्त उपस्थित होत आहे. शिक्षणावर सर्वाधिक बजेट आहे. तरीही वर्गखोल्यांची अवस्था अशी का, याचे मंथन जिल्हा परिषदेत पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे.‘जिल्हा परिषदेच्या शाळा खासगीपेक्षाही सरस’ असा अहवाल १६ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाºया ‘प्रथम’ या सामाजिक सेवाभावी संस्थेचावतीने प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेणाºया ‘असर’मार्फत राज्यस्तरावर पाहणी करण्यात आली. मात्र, ग्रामीण क्षेत्रात २०० शाळांच्या वर्गखोल्यांची स्थिती बघता, अमरावती जिल्हा परिषद यात माघारल्याचे दिसून येते.काही वर्षांपूर्वी तिवसा तालुक्यातील शेंदूरजना (माहुरा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वाराचे पिल्लर कोसळल्याने एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. परिणामी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक वर्गखोल्याचा कायापालट कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा मोडकळीस आल्या आहेत. शिकस्त वर्गखोल्याची परिस्थिती ही दोन ते तीन वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे. सन २०१६- २०१७ पासून जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील शिकस्त वर्गखोल्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. काही शाळांमध्ये वर्गखोल्या शिकस्त असल्याने एकाच वर्गात दोन वर्ग भरविले जातात. या शिकस्त वर्गखोल्या हजारो विद्यार्थ्यांच्या जीविताशी कधीही खेळ करू शकतात, असे वास्तव आहे. सन २०१८ ते २०२० या वर्षात शिक्षण विभागाकडे नवीन वर्गखोल्याचे बांधकाम, शाळा दुरुस्ती, संरक्षण भिंत, शौचालय बांधकाम आदींसाठी प्रस्ताव आले आहे. शाळा वर्गखोल्यांची दुरुस्ती व बांधकाम याविषयी अनेकदा शिक्षण समिती, सर्वसाधारण सभेत ठराव घेतले. मात्र, अंमलबजावणीचे घोडे अडले आहे.केव्हा पालटणार चित्र ?जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाºया अनेक शाळा व वर्गखोल्या धोकादायक स्थितीत आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थी अशाच जीवघेण्या इमारतीत ज्ञान संपादन करीत आहेत. त्यामुळे अशा शाळा आणि वर्गखोल्याचे चित्र केव्हा पालटणार.टाकरखेडा संभू येथील जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळण्याच्या स्थितीतभातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू स्थित जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या आवारातील सुरक्षाभिंत कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या शाळेत बालवाडी ते चौथीपर्यंत विद्यार्थी शिकतात. अनेकदा शाळकरी मुले भिंतीजवळ खेळतात. त्यातच वर्दळीच्या टाकरखेडा संभू ते रामा मार्गात ही शाळा आहे. त्यामुळे ये-जा करणारे नागरिक अनेकदा भिंतीजवळ उभे राहतात. भिंतीला तडे गेल्यामुळे ती कधी कोसळेल, याचा नेम नाही. मात्र, या गंभीर बाबीकडे शाळा प्रशासनासह जिल्हा परिषदेनेही दुर्लक्ष चालविले आहे.वर्गखोल्यांच्या किरकोळ व मेजर दुरुस्तीसाठी दोन वर्षांपासून निधी मिळाला नाही. अशातच आलेला निधी हा दायित्वावर खर्च झाला आहे. शाळा दुरुस्तीसंदर्भात निधी व न्यायालयीन अडचणी यामुळे ही कामे होऊ शकत नाही. ती पूर्ण करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.- जयंत देशमुख, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद