शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कागदावर २००, प्रत्यक्षात १० ते १२ शल्यक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:22 IST

दिवसाकाठी २०० भटक्या श्वानांवर शल्यक्रिया करून त्यांच्या उत्पत्तीवर नियंत्रण राखण्याच्या महापालिकेच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे.

ठळक मुद्देश्वान निर्बीजीकरणातील अनियमितता चौकशी समितीचा धक्कादायक निष्कर्ष

आॅनलाईन लोकमतअमरावती : दिवसाकाठी २०० भटक्या श्वानांवर शल्यक्रिया करून त्यांच्या उत्पत्तीवर नियंत्रण राखण्याच्या महापालिकेच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे. प्रत्यक्षात कोंडेश्वर येथील शल्यचिकित्सागृहात दिवसाला केवळ १० ते १२ श्वानांवर निर्बीजीकरण शल्यक्रिया करण्यात आल्याचा धक्कादायक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. या संपूर्ण प्रकरणातील लाखो रुपयांच्या अनियमिततेबाबत अहवाल ही समिती जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आयुक्तांना सुपूर्द करेल.महापालिका क्षेत्रात मागील १५ ते १६ महिन्यांत नऊ हजार श्वानांवर निर्बीजीकरण शल्यक्रिया झ्राल्याचे दर्शवून तब्बल ६७ लाख रुपयांची उचल करण्यात आली. सहायक पशू शल्यचिकित्सक सचिन बोंद्रे हे यात संशयाच्या केंद्रस्थानी आहेत. नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर चौकशी समितीच्या एका सदस्याने ही माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेजचा ‘एकजिनसीपणा’ही संशयास्पद आहे.‘श्वान निर्बीजीकरणात लाखोंचा भ्रष्टाचार’ या वृत्तमालिकेतून ‘लोकमत’ने ही अनियमितता चव्हाट्यावर आणली होती. विरोधी पक्षनेता बबलू शेखावत आणि आ. रवि राणा यांनी या प्रकरणी महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढले होते. त्याअनुषंगाने महापालिकेने १८ नोव्हेंबर २०१७ रोजी पाच सदस्यीय समिती गठित करण्यात केली होती. त्या समितीकडून सुरू करण्यात आलेल्या सर्वंकष चौकशीला आता अंतिम रूप देण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, मुख्य लेखापरीक्षक प्रेमदास राठोड, मुख्य लेखापरीक्षक प्रिया तेलकुंटे, सहायक आयुक्त योगेश पिठे आणि सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे सदस्य असलेल्या चौकशी समितीने कोंडेश्वर येथील श्वान शल्यक्रिया केंद्रात जाऊन अनियमिततेची वस्तुस्थिती जाणून घेतली. बोंद्रे यांना हाताशी धरून या ६७ लाख रुपयांवर कुणी डल्ला मारला, याच्या तळापर्यंत जाण्यासाठी चौकशी समिती सरसावली असताना, बोंद्रे यांच्याकडून चौकशी समितीला दस्तऐवजाबाबत सहकार्य मिळत नसल्याने समितीला मर्यादा आल्या आहेत.रजिस्टरवर दरदिवशी २०० शस्त्रक्रिया दाखविण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये केवळ १० ते १२ श्वानांवर शस्त्रक्रिया केल्याचे समितीला दिसले. पकडून आणलेल्या श्वानांवर खरीखुरी शस्त्रक्रियाच करण्यात आली की तसा भास निर्माण करण्यात आला, याबाबतही संदिग्धता आहे. सिस्टिम मॅनेजर अमित डेंगरे हे सीसीटीव्ही फुटेज व त्यासंबंधीच्या लेखी नोंदींची पडताळणी करीत आहेत. मुख्य लेखापरीक्षक प्रिया तेलकुंटे व मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड हे लेखाविषयक तपासणी करीत आहेत.लक्षवेधीवर चर्चाच नाही, गुढ उकलणे शक्यश्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करून आ. रवि राणा यांनी याप्रकरणी लक्षवेधी लावली होती. त्यासंबंधाने महापालिकेला माहितीही मागविण्यात आली. मात्र, यावर चर्चाच झाली नाही. आपली महापालिका म्हणून आ.राणा यांची सहानूभूती मिळविण्यात दोषींचा एक कंपू यशस्वी झाला. यातील दोषींवर शिक्कामोर्तब झाल्यास आणि पोलिसांनीही प्रकरणाची पाळेमुळे खणून काढल्यास इतरही गूढ उलगडू शकेल.