शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार हेक्टर बाधित

By admin | Updated: March 2, 2016 00:48 IST

जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे १९ हजार ६०५ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

गारपिटीचा तडाखा : तीन दिवसांतील नुकसान, बाधित क्षेत्र वाढणार अमरावती : जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे १९ हजार ६०५ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी रात्रीपर्यंत सुरू असलेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यात १० हजार ५७७ हेक्टरमधील पिके नेस्तनाबूत झाली आहेत. रबीचा हंगाम संपताना आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदा खरिपाचा हंगाम अपुऱ्या पावसामुळे उद्ध्वस्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार रबी हंगामावर होती. सद्यस्थितीत जिल्ह्यात दीड लाख हेक्टरमधील रबीची पिकेसुस्थितीत असताना वादळी पाऊस व गारपिटीने ६ हजार ७६१ हेक्टर क्षेत्रातील गहू, २ हजार ७४४ हेक्टरमधील हरभरा, १ हजार ५६७ हेक्टरमधील भाजीपाला, ८ हजार ९३ हेक्टरमधील फळपिके व १४० हेक्टरमधील इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असलेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात ९ तालुक्यांमधील शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाच्या मदतीकडे डोळे लागले आहेत. ंअंतिम अहवालाची प्रतीक्षाअमरावती : यामध्ये अमरावती तालुक्यात १ हजार ५२७ हेक्टर, वरुड ३४ हेक्टर, चांदूरबाजार ३ हजार ८४४ हेक्टर, अचलपूर २ हजार १४३ हेक्टर, भातकुली १०७ हेक्टर, धामणगाव २ हजार ४७३ हेक्टर, चांदूररेलवे २८४ हेक्टर, तिवसा ८४ हेक्टर व चिखलदरा तालुक्यात ८० हेक्टर शेतीपिक व फळपिकांचे नुकसान झाले आहे. सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे २३९ गावांमधील ६ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या ४ हजार २३२ हेक्टरमधील गहू, १ हजार ६४७ हेक्टरमधील हरभरा, ५ हेक्टरमधील कपाशी, ४६२ हेक्टरमधील भाजीपाला, ३ हजार ९०१ हेक्टरमधील फळपिके व ४५ हेक्टरमधील इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तीन दिवसांत चांदूरबाजार तालुक्यात सर्वाधिक ११ हजार ४५२ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक सर्वेक्षणाअंती १९ हजार ६०५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अहवाल असला तरी अंतिम अहवालात गारपिटीच्या नुकसानीची क्षेत्रवाढ होणार आहे. (प्रतिनिधी)