शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

‘प्लाझ्मा’साठी २० दाते तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST

कोरोना संक्रमणमुक्त रुग्णांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्तीमुळे प्लाझ्मा (रक्तातील पिवळसर द्रव) मध्ये अँटिबॉडीज तयार होतात. त्याचा वापर कोरोना क्रिटिकलच्या उपचारात केला जातो. अशा रुग्णाला प्लाझ्मा थेरपीमुळे ‘पॅसिव्ह इम्युनिटी’ मिळाल्याने तो अल्पावधीत बरा होतो. प्लाझ्मा मिळविण्यासाठी त्या दात्याची संमती लागते, असे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोरानावर प्रभावी उपचार । 'प्लाझा बँक'ही करणार तयार, आरोग्य यंत्रणा सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनावर मात करण्यासाठी आता जिल्ह्यात प्लाझ्मा थेरेपीचा वापर केला जाणार आहे. यासाठी २० दाते तयार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयात यासंदर्भातील यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. याअनुषंगाने प्लाझ्मा बँकही तयार करण्यात येणार आहे.कोरोना क्रिटिकल रुग्णांवर प्रभावी उपचार होऊन मृत्यूचा दर कमी करण्यासाठी ही थेरेपी उपयुक्त असल्याने याचा वापर करण्याविषयी आयसीएमआरने यापूर्वीच गाईडलाईन दिल्या आहेत. राज्यात मुंबईच्या लीलावती रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरेपी यशस्वी झाली आहे.कोरोना संक्रमणमुक्त रुग्णांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्तीमुळे प्लाझ्मा (रक्तातील पिवळसर द्रव) मध्ये अँटिबॉडीज तयार होतात. त्याचा वापर कोरोना क्रिटिकलच्या उपचारात केला जातो. अशा रुग्णाला प्लाझ्मा थेरपीमुळे ‘पॅसिव्ह इम्युनिटी’ मिळाल्याने तो अल्पावधीत बरा होतो. प्लाझ्मा मिळविण्यासाठी त्या दात्याची संमती लागते, असे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी सांगितले. रक्तातून प्लाझ्मा वेगळा काढून तो मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी वापरला जाईल. याद्वारे एका आठवड्यात रुग्ण बरा होऊ शकत असल्याचे सांगण्यात आले.अशी आहे प्रक्रियाकोरोना संक्रमणमुक्त व्यक्ती एक महिन्याच्या आत प्लाझ्मा दान करू शकते. यासाठी प्रथम चाचणी केली जाते. त्या व्यक्तीचे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ व वजन ५० किलोपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. साधारणपणे १८ ते ६० वयोगटातील व्यक्ती असावी, असे आरोग्य यंत्रणाद्वारे सांगण्यात आले.अशी आहे ‘प्लाझ्मा डिराइव्ह थेरेपी’कोरोना संक्रमणातून बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तामध्ये अँटिबॉडीज तयार होतात. अशा व्यक्तीची इम्यून सिस्टीम काही कालावधीसाठी चांगली होते व यामधून प्रोटिन्स उत्सर्जित होतात, जे प्लाझ्मामध्ये असतात. प्लाझ्मामध्ये असलेल्या अँटिबॉडीजला वेगळ्या काढल्या जातात आणि रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केल्या जातात. याला प्लाझ्मा डिराईव्ह थेरेपी म्हणतात. याद्वारे कोरोनाग्रस्ताच्या शरीरात या विषाणूविरुद्ध लढण्याची, प्रतिकार करण्याची क्षमता, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या थेरेपीचा वापर कोणत्या रुग्णासाठी करायचा हे उपचार करणारी डॉक्टर मंडळी ठरवितात, असे आरोग्य यंत्रणाद्वारे सांगण्यात आले.प्लाझ्मा देण्यासाठी २० दात्यांची नावे समोर आली आहेत. कोरोना संक्रमनमुक्त झाल्याच्या महिनाभराच्या आत त्या संक्रमणमुक्त रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा काढला जातो व संक्रमण असलेला व्यक्तीमध्ये इंजेक्ट केला जातो. याद्वारे त्यांची विषाणूविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती वाढते.- डॉ. श्यामसुंदर निकमजिल्हा शल्य चिकित्सकप्लाझ्मा थेरेपीचा आता प्रभावीपणे अवलंब केला जाणार आहे. यासाठी कोरोनामुक्त झालेले काही दातेही समोर आले आहेत. या थेरेपीसाठी आवश्यक यंत्रे जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्राप्त झाली आहेत. या यंत्रणेचे पालकमंत्र्यांनी उद्घाटन केले आहे.- शैलेश नवालजिल्हाधिकारी. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या