शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

ग्रामपंचायतीचे २० सदस्य अपात्र

By admin | Updated: May 7, 2015 00:08 IST

जिल्ह्यात २०१२-१३ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या परंतु निवडणूक खर्च विहित मुदतीत सादर न

२०१२-१३ मधील निवडणूक : मुदतीत खर्च सादर न केल्याने कारवाईअमरावती : जिल्ह्यात २०१२-१३ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या परंतु निवडणूक खर्च विहित मुदतीत सादर न करणाऱ्या ३२ उमेदवारांविरोधात मुंबई ग्रामपंचायत अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी पाच वर्षांसाठी अपात्रतेची कारवाई केली आहे. यापैकी २० सदस्य निवडून आलेले आहेत. ९२ उमेदवारांविरोधात प्रकरणे कार्यवाहीसाठी प्रक्रियेत आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांद्वारे प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे किंवा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांकडे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने सादर करणे बंधनकारक आहे. सन २०१२-१३ मध्ये जिल्ह्यातील १९२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक झाली. यामध्ये ३ हजार २२६ उमेदवार उभे होते. यापैकी २ हजार ४२९ उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर केले. परंतु ७९७ उमेदवारांनी खर्च सादर केला नाही. यामध्ये १३८ निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश आहे. ही प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलीत. या सदस्यांवर झाली अपात्रतेची कारवाईनिवडणूक खर्च सादर न केल्याने ५ वर्षांकरिता निवडणूक लढण्यास अपात्र ठरविण्यात आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये चिंचोली बु. येथील सुचिता केवटी, कैलाश मुरे, शरद गणगणे, नलिनी भरडे, कौशल्या अढाव, जवर्डी येथील कुंदा भिसे, निवृत्ती मांजरे, चंद्राबाई बोखाल, अभिजित मांजरे, पोहरा पूर्णा येथील राजू मेश्राम, दीपिका नेतनराव, विकास बोबडे, विद्या कांबळे, शकुंतला नेवाळकर, धम्मनंद गोंदने, रिता वैराळे, मिर्झापूर येथील विशाखा कांबळे, विशाखा घरडे, दिनेश सुखदेवे, प्रभाकर चुनडे यांचा समावेश आहे. या उमेदवारांवर झाली कारवाईनिवडून न आलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने त्यांच्यावरही अपात्रतेची कारवाई करण्यात आली. यामध्ये खोलापूर येथील सविता भटकर, बंडू वर्धे, चक्रधर खोडस्कर, सचिन बोथरिया, शमशाद बी जाकीर, पूर्णानगर येथील पवन भटकर, रामकृष्ण गवई, राजकन्या खटे, वनमाला बोबडे, गणेश कोल्हे, चेतन ढोले, दुर्योधन आठवले, रफीक शहा, अहमद शहा, श्याम आठवले यांचा समावेश आहे.