शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

२० लाखांचा पान मसाला,सुगंधित सिगारेटचा माल कुणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 22:43 IST

दर्यापूर पोलिसांनी अंजनगाव-अकोट मार्गावर टी-पॉइंटजवळ मध्यप्रदेशातून वाहतूक करणाºया ट्रकसह २० लाख ६ हजार ४०० रुपयांचा माल जप्त केला.

ठळक मुद्देकालू, अग्रवाल या नावांची चर्चा : दर्यापूरच्या गुटखा प्रकरणाचा गुंता कायम

आॅनलाईन लोकमतअमरावती : दर्यापूर पोलिसांनी अंजनगाव-अकोट मार्गावर टी-पॉइंटजवळ मध्यप्रदेशातून वाहतूक करणाºया ट्रकसह २० लाख ६ हजार ४०० रुपयांचा माल जप्त केला. पण, हा माल कुणाचा, याचा तपास चार दिवस होऊनही अन्न व औषध प्रशासनाला अद्याप लागलेला नाही.ठाणेदार मुकुंद ठाकरे यांनी गोपनीय माहितीवरून लाखो रुपयांचा पानमसाला मिश्रित गुटखा व सुगंधित सिगारेटचा माल जप्त केला. पण, पोलिसांना अवैध वाहतूक करणाºया ट्रकमालक-चालक तसेच व्यापारी यांच्यावर कारवाईचे आदेश नसल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने माल ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. परंतु, या घटनेला चार दिवस होऊनही ही खेप कोणाकडे जात होती, याचा तपास अद्यापपर्यंत लागलेला नाही. तथापि, मूर्तिजापूर येथील अग्रवाल व अकोला जिल्ह्यामधील गुटखा व्यापारी कालू यांची चर्चा पोलीस वर्तुळात होत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे तपास अधिकारी कार्यवाहीचा वेग वाढवणार का, हा प्रश्न याप्रकरणी उपस्थित केला जाऊ लागला आहे.बिल्टी १८ हजारांची, माल लाखोंचाट्रकमध्ये असलेल्या सुगंधित सिगारेटच्या एक बॉक्सची किंमत १८ हजार रुपये ट्रान्सपोर्ट बिल्टीवर टाकण्यात आली आहे. पण, त्या एका बॉक्सची किंमत लाखोंच्या घरात आहे. अशाप्रकारे वाहतूक केल्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे.गुटखा व्यापाऱ्याने दिली टीप!जिल्ह्यामध्ये गुटखा व्यापारी असलेला किंगमेकर यांनीच पोलिसांना मध्यप्रदेशमार्गे येणाºया ट्रकची टीप दिल्याची चर्चा पोलीस विभागामध्ये रंगत आहे.अजूनपर्यंत कोणाचा माल होता व तो कुठे जात होता, या सर्व गोष्टी तपासायला वेळ लागणार आहे.- विश्वजित शिंदे,अन्न व औषध प्रशासन विभाग, अमरावती