शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

२० कीर्तनकार देणार कुपोषणमुक्तीसाठी सेवा

By admin | Updated: January 15, 2017 00:11 IST

आदिवासी बहुल, दुर्गम भागात अंधश्रद्धेचे वाढते प्रमाण आहे. हा पगडा दूर करण्यासाठी आता आरोग्य विभागाद्वारा कीर्तनकारांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे.

जनजागृती : अंधश्रद्धा मिटविण्याचा आरोग्य यंत्रणेचा प्रयासअमरावती : आदिवासी बहुल, दुर्गम भागात अंधश्रद्धेचे वाढते प्रमाण आहे. हा पगडा दूर करण्यासाठी आता आरोग्य विभागाद्वारा कीर्तनकारांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २० कीर्तनकारांची निवड करण्यात आलेली आहे. ते या दुर्गम भागात अनिष्ट प्रथा व अंधश्रद्धेचा समुळ नाश करण्यासाठी आरोग्याचा जागर करणार आहे. अंधश्रद्धेमुळे आदिवासी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या आदिवासींवर ‘भुमका’चा प्रभाव अधिक असल्याने अंधश्रद्धा वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे या दुर्गम भागातील माता व बाल मृत्यूचा दर कमी करण्यास आरोग्य यंत्रणेला अपयश आले आहे. त्यामुळे युनिसेफद्वारा राबविण्यात येणाऱ्या आरोग्य प्रकल्पामध्ये कीर्तनकारांची सेवा या कामी घेण्याचे ठरविण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबात वडीलधाऱ्या व्यक्तींचे ऐकल्या जाते. त्यामुळे परिवारातील वडीलधारी व्यक्ती जागृत झाल्यास कुटूंबही सज्ञान होण्यास मदत होणार आहे. समाजमनावर कीर्तनकारांच्या जागृतीचा सकारात्मक परिणाम लक्षात घेता शासनाने हा पर्याय निवडला आहे. अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोदले यांच्या सहकार्याने कुपोषणग्रस्त जिल्ह्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात २० कीर्तनकारांची मदत घेण्यात येत आहे व या सर्व कीर्तनकारांना महसूल विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षित करण्यात येत आहे. या कीर्तनकारांना महसूल विभागनिहाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मानवी जीवनात गर्भधारणेपासून ते बाळ दोन वर्षाचे होईपर्यंत हे हजार दिवस आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असतात त्याच काळात बाळाच्या शरीराची आणि बुद्धीची बांधणी होते. त्यामुळे या काळात महत्वाची काळजी घ्यावी लागते व यासाठी कीर्तनकाराच्या माध्यमातून आरोग्य विषयक समस्यांचा जागर करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)संताच्या शिकवणीतून करणार आरोग्याचा जागरपहिल्या टप्प्यात अमरावती विभागासह औरंगाबाद व नागपूर जिल्ह्यातील कीर्तनकारांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या कीर्तनकारासाठी युनिसेफ व आरोग्य विभागाने स्वतंत्र पुस्तिका तयार केली आहे. यामध्ये कोणत्या अनिष्ट प्रथा व रुढीपरंपरा आरोग्याला बाधक आहेत याची माहिती संताच्या शिकवणीतून देण्यात आलेली आहे.