शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

२० दिवसांत ३९ जणांना डेंग्यूंचा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:13 IST

अमरावती : दिवसेंदिवस डेंग्यूची वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्ह्याची चिंता वाढली आहे. यंदा सहा महिन्यात सहा रुग्ण व जुलै महिन्याच्या ...

अमरावती : दिवसेंदिवस डेंग्यूची वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्ह्याची चिंता वाढली आहे. यंदा सहा महिन्यात सहा रुग्ण व जुलै महिन्याच्या २० दिवसांत डेंग्यूचे २६४ संशयित रुग्णांची नोंद झाली. नंतरच्या सात दिवसांत यात १७३ ने यात वाढ झाली. यामध्ये ३९ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.

पावसाळ्याला सुरुवात होताच कीटकजन्य आजारात वाढ झालेली आहे. यात प्रामुख्याने डासांची उत्पत्ती वाढल्याने तापाचे रुग्ण वाढत आहे. डेंग्यूसोबत मलेरिया आणि चिकनगुनियाची रुग्णसंख्या वाढतीच आहे. २० जुलैपर्यंत महापालिका क्षेत्रात डेंग्यूचे ७८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये १२ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने प्रशासन कामाला लागले आहे. महापालिका आयुक्तांनी आरोग्य व स्वच्छता विभागाचा आढावा घेत कानपिचक्या घेतल्या.

ज्या प्रभागात डेंग्यूचे रुग्ण आढळतील त्या प्रभागातील एसआयला नोटीस बजावली जाणार आहे. याशिवाय एएनएमच्या गृहभेटी वाढवून नागरिकांना आजारासंदर्भातील माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हा परिषद सीईओंनी याहीपुढे ज्या नागरिकांच्या घरी डेंग्यूच्या अळ्या आढळतील त्यांच्यावर कारवाईचे सुतोवाच केले आहे.

पाईंटर

डेंग्यू संशयित : २६४

पॉझिटिव्ह : ३९

मलेरिया पॉझिटिव्ह : ०७

चिकनगुनिया पॉझिटिव्ह : ०४

बॉक्स

ग्रामीणमध्ये वाढता उद्रेक

जिल्हा ग्रामीणमध्ये डेंग्यूचा उद्रेक वाढला आहे. यामध्ये अचलपूर्, चिखलदरा व तिवसा तालुका हॉटस्पॉट ठरत आहेत. याशिवाय नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, व चांदूर रेल्वे तालुक्यातही डेंग्यूचा शिरकाव झालेला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी गांर्भायाने घेणे महत्त्वाचे आहे. याशिवाय अमरावती शहरातिल डेंग्यूने डोके वर काढले आहे.

बॉक्स

मलेरिया, चिकगुनियाचेही रुग्ण वाढले

पावसामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने मलेरियाचेही रुग्णसंख्या वाढती आहे. १.३६ लाख नमुन्यांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली. यात जून महिन्यात सात पाॅझिटिव्हची नोंद झाली. याशिवाय डेंग्यूच्या नमुन्यांमध्येच चार रुग्ण चिकनगुनिया पाॅझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांनी दिली.

कोट

आरोग्य व स्वच्छता विभागाला नाल्यांच्या स्वच्छतेसोबतच कुठेही कचरा साठणार नाही. कंटेनरची तपासणी व ताप असलेल्या संशयितांचे तातडीने नमुने घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

- प्रशांत रोडे,

आयुक्त, महापालिका