शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

२० टक्के निधीचा तिढा कायमचा अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:32 IST

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सन २०१४-१५ मध्ये मागासवर्गीय वस्ती विकासासाठी १४ तालुक्यांतील विविध गावांमध्ये विकासाचे कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देसमाजकल्याण : मुदतवाढीचा प्रस्ताव शासनदरबारी पडून

अमरावती : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सन २०१४-१५ मध्ये मागासवर्गीय वस्ती विकासासाठी १४ तालुक्यांतील विविध गावांमध्ये विकासाचे कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र, कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींना शासनाकडून अखेरच्या टप्प्यातील २० टक्के निधी दिला जातो. त्यानुसार सदर निधीसाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने शासनाकडे २० टक्के निधी देण्यासाठी मुदतवाढ व निधी उपलब्ध द्यावा, यासाठी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्यापही निधीचे घोडे अडल्याने आता मुदतवाढीच्या प्रस्ताव व निधीसाठी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सुशीला कुकडे व अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी यावर तोडगा काढण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला आहे.जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने १४ पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील विविध गावांत मागासवर्गीय वस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. सन २०१४-१५ मध्ये ही कामे पूर्ण केली. मात्र, यामधील काही गावांतील कामांना विहित मुदतीपेक्षा अधिक विलंब झाला. अशातच शासनाने जिल्हा परिषदेकडे अखर्चित असलेला निधी परत मागवून घेतला आहे. त्यानुसार मागासवर्गीय वस्तीसह अन्य योजनांचे जवळपासन ५६ कोटी रुपये शासनाकडे समाजकल्याण विभागाने जमा केले आहेत. परिणामी वरील कालावधीत जी कामे केलीत, ती कामे पूर्ण झाल्यानंतर दोन टप्प्यात प्रत्येकी ४० टक्क्यांप्रमाणे निधी देण्यात आला आहे. असा एकूण ८० टक्के निधी संबंधित ग्रामपंचायतींना दिला आहे. त्यानंतर समाजकल्याण विभागाकडून सदर कामाची पाहणी केल्यानंतर उर्वरित २० टक्के निधी सदर ग्रामपंचायतींना देणे आवश्यक आहे. मात्र, हा निधी अद्याप मिळाला नसल्याने २० टक्के निधीचे घोडे सध्या मुदतवाढीत व निधीसाठी अडले आहे. त्यामुळे या गावांत पुन्हा कामे करण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे शासनाने मुदतवाढ व निधी द्यावा, यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी शासनाकडे यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला.कामे तांत्रिक अडचणीतजिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने मागासवर्गीय वस्त्यांसाठी विकासकामांचे नियोजन केले आहे. सुमारे २० कोटींचे नियोजन समाजकल्याण विभागाने तयार केले असले तरी या कामांना जिल्हा प्रशासनाकडून तांत्रिक अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, या कामांचा तांत्रिक अहवाल नसल्यामुळे २० कोटी रुपयांची विकासकामे पेंडिंग पडली आहेत. यावर आता सीईओंच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करू न ही कामे मार्गी लावण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.मागासवर्गीय वस्तीचा हा निधी आहे. मात्र, तो मिळत नसल्याने मागासवर्गीय वस्तीमधील इतर कामे अडकली आहे. त्यामुळे या वस्त्यावरील अन्याय दूर करावा व शासनाने तातडीने निधी द्यावा.- सुशीला कुकडे, सभापती समाजकल्याण समिती