शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील ब्रिटिशकालीन २० पूल अत्यंत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST

फोटो २३एमएमपीएच०१, २३एमएमपीएच०२, २३एमएमपीएच०३, २३एमएमपीएच०४ कॅप्शन : (सेमाडोह येथील भुतखोरा पुलावर धोकादायक असल्याचे फलक लावण्यात आले. लोकमत विशेष नरेंद्र ...

फोटो २३एमएमपीएच०१, २३एमएमपीएच०२, २३एमएमपीएच०३, २३एमएमपीएच०४

कॅप्शन : (सेमाडोह येथील भुतखोरा पुलावर धोकादायक असल्याचे फलक लावण्यात आले.

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : शंभर वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेल्या मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील मुख्य मार्गावरील ब्रिटिशकालीन ११८ पुलांपैकी २० पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरले आहे. परतवाडा - इंदूर मार्गावरील सेमाडोहचा भुतखोरा पूल खचल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आली आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी व्याघ्र प्रकल्पाला गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या परवानगीचे पत्र दिले. मेळघाटात चार नवीन पुलाच्या निर्मिती सह १६ पुलांची दुरुस्ती आवश्यक असून अन्यथा पावसाळ्यात मेळघाटातील अनेक गावांचा संपर्क तुटण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

मेळघाटात गुरुवारी पहाटे ढगफुटी झाली. मुसळधार पावसामुळे सर्वत्र नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहे. सिपना, चंद्रभागा, शहानूर, खुर्शी आदी महत्त्वपूर्ण नद्यांना पूर आला परिणामी अनेक ठिकाणी दरड कोसळल्या, तर रस्ते खरडून गेले. त्यातच मुख्य मार्गावरील पुलांनासुद्धा क्षती पोहचली आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक यांना सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दुरुस्तीच्या परवानगी संदर्भात पत्र देण्यात आले आहे. मेळघाटातील विकासात्मक कामासाठी आता व्याघ्र प्रकल्पाची परवानगी गरजेची झाली आहे. सेमाडोह येथील भुतखोरा पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रवास करताना दक्षता घेण्याचे फलक लावले आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यास ही वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.

बॉक्स

पूल न झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

परतवाडा ते धारणी इंदूर मार्गावरील सेमाडोह (भुतखोरा) हरिसाल येथील ४० वर्षे जुन्या पुलाचे बिम, गडर उघडे पडल्याने धोका निर्माण झाला आहे. धारणी ते दिया मार्गावरील दोन पुलासह एकूण चार नवीन पुलांची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने करायची आहे. हे पूल न झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

कोट

मेळघाटातील ११८ ब्रिटिशकालीन पूल आणि पैकी चार नवीन पुलांची निर्मिती व १६ पुलांची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे सेमाडोह हरिसाल दिया येथील महत्त्वपूर्ण प्रस्तावित केलेले पूल आहे भूत खोरा तुला संदर्भात व्याघ्र प्रकल्पाला गुरुवारी दुरुस्तीच्या परवानगीचे पत्र पाठविले आहे

- चंद्रकांत मेहत्रे,

कार्यकारी अभियंता

सार्वजिन बांधकाम विभाग, अचलपूर

कोट

पुलाच्या दुरुस्ती संदर्भात व्याघ्र प्रकल्पाच्या अधिनियमानुसार परवानगी आवश्यक आहे. पत्र मिळाल्यावर वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात येईल. त्यानुसार योग्य निर्णय कळविला जाईल.

- कमलेश पाटील,

सहायक वनसंरक्षक,

सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा