शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २ हजार ५०० अंगणवाड्यांना लागले टाळे

By जितेंद्र दखने | Updated: December 4, 2023 20:13 IST

४ हजारावर सेविका-मदतनीस संपात : शासकीय कर्मचारी दर्जाची मागणी

अमरावती: अंगणवाडी सेविकांना महिना २६ हजार आणि मदतनीसांना २० हजार रुपये मानधन द्या, कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी बेमुदत संप सुरू केला आहे. या संपात सुमारे ४ हजार सेविका-मदतनीस सहभागी झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील सुमारे २ हजार ५०० हजार अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या राज्य तसेच केंद्र शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याबाबर वारंवार आंदोलने केलीत. परंतु, आश्वासनाशिवाय त्यांना काही मिळाले नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी,बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)च्या नेतृत्वात राज्यव्यापी संप सुरू केला आहे. सोमवार हा आंदोलनाचा पहिला दिवस होता. या संपात २३१३ अंमणवाडी सेविका आणि २३१३ मदतनिस असे एकूण ४ हजार ६२६ कर्मचारी यात सहभागी झाल्या होत्या.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे ही वैधानिक असून त्यांना मिळणारा मोबदला वेतनच आहे. त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करुन त्या अनुषंगाने वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ द्यावा. मानधन वाढलेतरी महागाई दुपटीने वाढते. यासाठी महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी मानधनात वाढ करावी. कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रस्ताव तयार करुन तो हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा अशा विविध मागण्यांसाठी संप सुरु असल्याचे अंगणवाडी,बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.आ. रोहीत पवारांची घेतली भेटजिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांनी आपल्या न्यायीक मागण्यासाठी सोमवार ४ डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे.अंगणवाडी व मदतनीस यांच्या शासन दरबारी अनेक मागण्या प्रलंबीत आहे.या मागण्याच्या पुर्ततेसाठी संपकरीअंगणवाडी सेविकांनी सध्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे वतीने आमदार रोहीत पवार यांच्या नेतृत्वातील संघर्ष यात्रा जिल्ह्यात दाखल झाली आहे.या यात्रेत पापळ येथे आ.रोहीत पवार यांना जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी मागणीचे निवेदन देवून मागण्याकडे लक्ष वेधले.

टॅग्स :Amravatiअमरावती