शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

१९ कैद्यांचे शेतकरी कर्जमुक्तीसाठी आर्जव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 23:24 IST

राज्य शासनाच्या शेतकरी सन्मान कृषि कर्जमुक्ती योजनेतंर्गत येथील मध्यवर्ती कारागृहातील १९ कैद्यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी आॅनलाईन आर्जव केलेले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांचा पुढाकार : प्रशासन पोहोचले कारागृहात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाच्या शेतकरी सन्मान कृषि कर्जमुक्ती योजनेतंर्गत येथील मध्यवर्ती कारागृहातील १९ कैद्यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी आॅनलाईन आर्जव केलेले आहे. कैद्यांना शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासन लवाजाम्यासह कारागृहात पोहचले होते, हे विशेष.कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांना जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र असलेल्या बंदीजनांचा शोध घेतला. त्यानुसार १९ व २० सप्टेंबर रोजी मध्यवर्ती कारागृहात १९ कैदी बांधवांचे शेतकरी कर्जमुक्तीसाठी आॅनलाईन अर्ज भरुन घेण्यात आले. कारागृहात विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असताना शासनाच्या शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याने कैद्यांच्या आनंदात भर पडली आहे. शासन निर्णयानुसार कोणताही शेतकरी हा कर्जमुक्तीपासून वंचित राहू नये, याकरिता शासन, प्रशासन स्तरावर प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांचे शेतकरी कर्जमुक्तीसाठी आॅनलाईन अर्ज भरुन घेण्यात आले. आॅनलाईन अर्ज भरुन घेताना जिल्हा प्रशासन चमुने कैद्यांच्या बोटांचे ठसे, आधार क्रमांक, कर्जाची रक्कम, डोळ्यांचे स्कॅनिंग आदी महत्वाची माहिती भरुन घेतली आहे. आॅनलाईन अर्ज भरुन घेताना प्रशासनाने सुसज्ज यंत्र सामग्री सोबत आणली होती. कैदी बांधवांना शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक जाधव, तुरुंगाधिकारी बी.एस. सदांशिव, आर.जी. वडते आदींनी अथक परिश्रम घेतले. कारागृह प्रशासनाच्यावतीने कैद्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.