शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्याला बसले भूकंपाचे १८ धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 16:57 IST

जिल्ह्यातल्या मेळघाटातील साद्राबाडी या गावात मंगळवार आणि बुधवारच्या रात्री २.३० ते सकाळी ९ वाजेपर्यंत भूकंपाचे तब्बल १८ धक्के बसले.

ठळक मुद्देमेळघाटातील साद्राबाडी हे मुख्य केंद्रतिसऱ्यांदा धरणीकंप भिंतींना तडे, घरही कोसळले, नागरिकांमध्ये घबराट

पंकज लायदेअमरावती : जिल्ह्यातल्या मेळघाटातील साद्राबाडी या गावात मंगळवार आणि बुधवारच्या रात्री २.३० ते सकाळी ९ वाजेपर्यंत भूकंपाचे तब्बल १८ धक्के बसले. या धक्क्यांची तीव्रता इतकी अधिक होती की, प्राथमिक आरोग्य केंद्रालगतच्या एका घराला तडे गेले. त्याशिवाय आणखी एक घर कोसळले. वारंवार होऊ लागलेल्या या धरणीकंपामुळे मेळघातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. भुकंपाच्या घटनेची दखल जिल्हा प्रशासनाने योग्य त्या गांभीर्याने घेतली नसल्याची तक्रार नागरिकांची आहे.मेळघाटातील धारणी तालुक्यातील तापीनदीलगत असलेल्या साद्राबाडी या परिसरात १७ आॅगस्ट रोजी भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्याची तीव्रता कमी होजी. २१ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के पुन्हा जाणवले. सदर भुकंपाची तीव्रता पूर्वीच्या तुलनेत अधिक होती. सदर घटनेनंतर १५ तासांनी पुन्हा मध्यरात्री अडीच वाजतापासून धरणीकंप सुरू झाले. सकाळपर्यंत भूकंपाचे एकूण १८ धक्के जाणवले. या धक्क्यांची तीव्रता सर्वाधिक होती. प्राथमिक आरोग्य केंद्रालगतच्या प्रदीप सोनी यांच्या घराच्या भिंतीला तडे जाऊन अर्धे घर कोसळले. उपविभागीय अधिकारी राहुल कार्डिले आणि अधिनिस्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी साद्राबाडी गावाला भेट दिली.अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, कारवाई का नाही?अधिकाऱ्यांनी तिसऱ्यांदा झालेला भुकंप गांभीर्याने घेतला. पहिल्या भुकंपांदरम्यान त्यांनी दुर्लक्ष का केले? दखल का घेतली नाही? गावकऱ्यांचे मनोधैर्य का वाढविले नाही? आपत्कालीन व्यवस्था का कार्यान्वित केली नाही? आदी प्रश्न अनुत्तरीत आहेत. आदिवासी गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारर्वाइची मागणी केली जात आहे.इमारतीबाहेर रुग्णांची तपासणीभूकंपाची तीव्रता वाढत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत रुग्णांच्या तपासणी न करता ती आवारात तंबू उभारून करण्यात आली. रुग्णांची तपासणी त्या तंबुतच सुरू आहे.चिमुकल्यासोबत बाहेर काढली रात्रमध्यरात्रीच भूकंपाच्या धक्क्याने जागी आलेल्या सोनी परिवारातील एका महिलेने चिमुकल्याच्या बचावासाठी घराबाहेरच अवघी रात्र जागून काढली.या गावांना जाणवले भूकंपाचे धक्केबुधवारच्या मध्यरात्री अडीच वाडता झालेल्या भूकंपाची तीव्रता परिसरातील धूळघाट रोड, सुसर्दा, नागुढाणा, झिलपी, खापरखेडा, गभेरी, भोकरबर्डी, दाबिदा, पानखाल्या या गावांना जाणवल्याची प्रशासनाची माहिती आहे.

टॅग्स :Earthquakeभूकंप