मोहन राऊत - अमरावतीगर्भवती महिलांना एचआयव्हीची लागण होऊ नये, लागण झालीच तर आजाराचा फैलाव वाढू नये, याकरिता एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यालयाच्यावतीने सर्वच महिलांची तपासणी होत असून मागील चार वर्षांत १७५ एचआयव्ही बाधित गर्भवती महिला आढळून आल्या आहेत़ सीमावर्ती भागातील तालुक्यांमध्ये ही संख्या अधिक आहे. प्रत्येक गर्भवती महिलेची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात समुपदेशन केंद्र आहे़ १६ ठिकाणी केंद्र, २६ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच २२ खासगी रूग्णालयांत गर्भवती महिलांना एचआयव्हीची तपासणी करता येते़ गेल्या पाच वर्षांत या केंद्रातून तपासणी झाल्यानंतर एचआयव्ही बाधित गर्भवतींची संख्या घटत असल्याचे दिसून येते. एड्सबाधित गर्भवतींना प्रसूतीच्या आठ तास पूर्वी निरॅपिन नावाची गोळी दिली जात होती. आठ तासांत प्रसूती न झाल्यास दुसरी गोळी दिली जायची.
१७५ गर्भवतींना ‘एड्स’ची लागण
By admin | Updated: October 28, 2014 22:49 IST