आस्कस्मिक तपासणी : अध्यक्षांनी ताब्यात घेतले मस्टरअमरावती : वेळेला दांडी मारून सवडीने कार्यालय गाठणाऱ्या जिल्हा परिषदेतील १७ लेटलतिफ कर्मचाऱ्यांना गुरूवारी सकाळी १०.३० ते १०.१४ या वेळेत जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांनी पकडले. सर्वाधिक लेटलतिफ कर्मचारी बांधकाम विभागात आढळले, त्यापाठोपाठ महिला व बालकल्याण, आरोग्य, भूजल सर्वेक्षण, लघुसिंचन, पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचा उशिरा येणाऱ्यांमध्ये समावेश आहे. गैरहजर असणाऱ्यांचा सुटीचा अर्जही नव्हता. आरोग्य विभागातील एका लेटलतिफ कर्मचाऱ्याची पुढील दोन दिवसांची स्वाक्षरी होती. 'लोकमत'च्या दणक्याने हे सारे घडले.गुरूवारी अचानक जिल्हा परिषदेतील विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या मस्टरची तपासणी केली असता यामध्ये १७ कर्मचारी लेटलतिफ आढळून आलेत. त्यावर नियानुसार कारवाई करण्याचे निर्देश सीईओंना दिले आहेत. बॉयोमेट्रिक मशिन बसविण्यात येईल. - सतीश उईके,अध्यक्ष, जिल्हा परिषद.
१७ लेटलतिफ, कारवाई करणार
By admin | Updated: February 12, 2016 00:53 IST