शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार लीटर दुधाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:43 IST

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुधाची वाढती मागणी लक्षात घेता शासकीय दुग्ध विकास यंत्रणेद्वारा शहरासाठी तीन दिवसांत आठ हजार लीटर दुधाचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देआज कोजागिरी पौर्णिमा : सहा हजार लीटर दुधाचे अतिरिक्त संकलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुधाची वाढती मागणी लक्षात घेता शासकीय दुग्ध विकास यंत्रणेद्वारा शहरासाठी तीन दिवसांत आठ हजार लीटर दुधाचे नियोजन केले आहे. खासगी दूध डेअरींमध्येसुद्धा दुग्ध उत्पादकांकडून अंदाजे आठ हजार लीटर दुधाची विक्री होणार असल्याची माहिती आहे.कोजागिरी पौर्णिमेला दुधाचे विशेष महत्त्व असून ठिकठिकाणी नागरिक एकत्र येतात. चंद्रप्रकाशाच्या साक्षीने आनंदाने दूध उकळून पितात. या सणाकरिता शासकीय दुग्ध विकास यंत्रणेने तीन दिवसांत सहा हजार लीटर दुधाचे अतिरिक्त संकलन केले आहे. दोन हजार लीटर दुधाची मागणी वर्धा जिल्ह्याकडे नोंदविण्यात आली आहे. चांदूररेल्वे तालुक्यातील कारला येथे एका खासगी डेअरीमध्ये रोज १३ ते १४ हजार लीटर दुधाचे संकलन होते. परंतु ते दूध नागपूर जिल्ह्यात पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे.दुग्ध विकास केंद्राकडून नोंदणीकृत प्राथमिक सहकारी दुग्ध उत्पादक संस्थाना खासगी डेअरींपेक्षा फारच कमी दर मिळत असल्याने अनेक संस्था बंद झाल्या, तर काही संस्था अवसायनात निघाल्या आहेत. परंतु ज्या काही ग्रामीण भागात दुग्ध उत्पादित शेतकरी आहेत. त्यांना खासगी डेअरींमध्ये ३५ ते ४० रूपये पर्यंत प्रतीलीटर भाव मिळत असल्याने तेथे दुधाच्या विक्रीला प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी खासगी दुध डेअरींमध्ये धाव घेतली असून एक दिवस पूर्वीच दूध आरक्षित केले आहेत.दुधाचे भाव वधारलेकोजागिरीसाठी गुरूवारी हजारो लीटर दुधाची आवक वाढणार आहे. बुधवारपासूनच खासगी दूध डेअरींवर नागरिकांनी धाव घेतली असून ४० ते ५० रूपये प्रतिलीटरला मिळणारे दूध ६० ते ७० रूपये लीटरपर्यंत विक्री केली जात आहे. शासकीय दुग्ध विकास केंद्रात तयार होणारे पाकीटबंद दूध किरकोळ विक्रेत्यांनी आरक्षित केलेले आहे.एफडीएची नजरदुधात पाणी टाकून भेसळ केली जाते. तसेच कृत्रिमरीत्या तयार केलेले दूध बाजारपेठेत विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुधातील 'सॉलिड नॉट फॅट' (एसएनएफ)चे प्रमाण तपासण्यात येणार असल्याचे अन्न प्रशासन विभागाने सांगितले..रोज दोन ते अडीच हजार लीटर दूध संकलन होते. पण कोजागिरीच्या नियोजनासाठी तीन दिवसांपासून दूध संकलन करण्यात येत आहे.- एस.बी. जांभुळे जिल्हा दुग्ध विकास अधिकारी