शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

१६ हजार हेक्टर क्षेत्र नापेर

By admin | Updated: January 4, 2015 23:03 IST

जिल्ह्यात रबी हंगामाकरीता असणाऱ्या एकूण १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ३१ हजार ७०८ क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१४ पावेतो पेरणी झालेली आहे. कृषी विभागाने नियोजन केल्याच्या

रबी हंगाम : अंजनगाव तालुक्यात ३६ टक्केच पेरणीअमरावती : जिल्ह्यात रबी हंगामाकरीता असणाऱ्या एकूण १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ३१ हजार ७०८ क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१४ पावेतो पेरणी झालेली आहे. कृषी विभागाने नियोजन केल्याच्या तुलनेत हे पेरणी क्षेत्र ८९ टक्के आहे. रबी पेरणीचा कालावधी संपल्यागत असल्याने १६ हजार २५८ हेक्टर क्षेत्र नापेर राहणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यात पेरणीपासून पावसाने दीड महिना दडी मारली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला सुरुवात झाली. याचा परिणाम होऊन रबी हंगामाची पेरणी दोन महिने माघारली. साधारणपणे पावसाचे १२० दिवस असतात व ८०० ते ८५० मि. मी. पावसाची सरासरी असायला पाहिजे परंतु यंदा ५५० मि. मी. पाऊस पडला. त्यामुळे रबी हंगाम पेरणीसाठी जमिनीत पुरेसी आर्द्रता नसल्याने हरभऱ्याची उगवणशक्ती कमी झाली. जिल्ह्यात ९० टक्के पेरणीक्षेत्रात कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी केल्या जाते. मात्र हलक्या प्रतिच्या जमिनीत पुरेश्या आर्द्रतेमुळे रबीची पेरणी झालेली नाही. परिणामी असे १२ हजारावर हेक्टर क्षेत्र नापेर राहीले आहे. या आठवड्यात अवकाळी पाऊस पडला. मात्र रबी हरभरा पेरणीचा अंतिम कालावधी १५ नोव्हेंबर पावेतो असतो त्यामुळे आता कालावधी संपल्यानंतर हरभरा पेरणी शक्य नाही. त्यामुळे या पाऊसाचा फायदा पेरणी झालेल्या हरभरा, गहू पिकाला होणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत धारणी तालुक्यात १४,६७६ हेक्टर, चिखलदरा ४४६०, अमरावती ८०९०, भातकुली ७९४४, नांदगाव खंडेश्वर ९७६०, चांदूररेल्वे ६१६८, तिवसा ९१७६, मोर्शी ७८६६, वरूड ७३२४, दर्यापूर २०५९२, अंजनगाव ६६७६, अचलपूर ५६२७, चांदूरबाजार ९६२२, धामणगाव १३,७२७ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी आटोपली आहे. रबीचा हंगाम दोन महिने माघारल्याने याचा विपरीत परिणाम उत्पन्नावर होणार आहे. (प्रतिनिधी)