शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१६ कर्मचारी निलंबित, एक बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसटी महामंडळाने ८ व ९ जून रोजी संपात सहभागी असणाऱ्या जिल्ह्यातील १६ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, तर एका कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी दोनदिवसीय संप पुकारला होता. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीची सेवा खंडित झाली. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या ...

ठळक मुद्देएसटी महामंडळाची कारवाई : संपात सहभागी होणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसटी महामंडळाने ८ व ९ जून रोजी संपात सहभागी असणाऱ्या जिल्ह्यातील १६ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, तर एका कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी दोनदिवसीय संप पुकारला होता. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीची सेवा खंडित झाली. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपात कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. संपकाळात जिल्ह्यासह शहरात कार्यरत असलेल्या विविध आगारांतील कर्मचाऱ्यांची संख्या बरीच होती. त्यामुळे एसटी वाहतूक पूर्णत: कोलमडली. परिणामी मध्यवर्ती बसस्थानकासह अन्य आगारातील दैनंदिन २ हजार ८० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. संपाचा फटका नागरिकांना बसला. काही जण संपकाळात जेथे होते तेथे अडकून पडले होते.दरम्यान, संपकाळात सहभागी चालक-वाहक, सहायक अशा एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईच्या सूचना महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधित विभागांना देण्यात आल्या होत्या. हा आदेश प्राप्त होताच संपात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील एकूण १७ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये परतवाडा आगारातील १५, अमरावती येथील एक अशा १६ कर्मचाऱ्यांचे निलंबन, तर वरूड आगारातील एका कर्मचाऱ्याला बडतर्फ केल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.संपकाळात ३५ लाखांचे नुकसानएसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपकाळात विभागातील बहुतांश एसटी बस उभ्या होत्या .२ हजार ८०० फेºया रद्द झाल्याने विभागाचे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.एसटी महामंडळाच्या वरिष्ठ विभागाकडून प्राप्त आदेशानुसार ८ ते ९ जून दरम्यान संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन, तर एकाला बडतर्फ करण्यात आले आहे. प्रवाशांना वेठीस धरून संप पुकारल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.- श्रीकांत गभणेविभाग नियंत्रक

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ