लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून जिल्ह्यातील १,५८९ गावांपैकी १,५७३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. १० तालुक्यातील १६ गावांत २२ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ५० गावांनी कोरोनाला शिरकाव करूच दिला नाही. या गावांमध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान जिल्ह्यातील १,५७३ गावे आज अखेर पूर्ण मुक्त झाले आहेत.कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरुवातीला अनेक गावांनी कडक उपाययोजना करून कोरोना संकटाला गावात येऊ दिले नाही. पण लॉकडाऊन नंतर निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरातील लोकांचे गावाकडे येणे -जाणे सुरू झाले. ग्रामीण भागातही कोरोनाची लागण सुरू झाली. कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेतच तर बहुतांश गावे कोरोनाश्या विळख्यात सापडली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मिळून जिल्ह्यात ८३९ ग्रामपंचायतींमधील बहुतांश गावात कोरोनाचा संसर्ग पसरला तरीदेखील ५० पेक्षा अधिक गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने हळूहळू गावेदेखील कोरोनामुक्त व्हायला सुरुवात झाली.
दररोज २ ते अडीच हजार चाचण्याजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोरोनाचा चाचण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. आजही ग्रामीण भागात दररोज २ ते २५०० हजार लोकांची कोरोना चाचणी केली जाते. यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेले रुग्णांचे प्रमाणे कमी झाले आहे.
ग्रामीणमध्ये ५ लाख चाचण्याजिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात आतापर्यंत ५ लाख २८ हजार ९१४ कोरोना चाचण्या घेण्यात आल्यात. यात अद्याप ५१,६९१ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याची नोंद आहे. त्यातील ५१,६६९ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत २२ रुग्ण उपचार घेत आहेत.