शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आरएफओंची १५२ पदे रिक्त; वन्यजीव विभागाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 19:45 IST

राज्याच्या वन विभागात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची वर्षभरापासून १५२ पदे रिक्त आहेत. तर, वन्यजीव विर्भातगातील १९ पदे असल्याने वनविर्भातगाच्या कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. परिणामी वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देवर्षभरापासून प्रभारीवर कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या वन विभागात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची वर्षभरापासून १५२ पदे रिक्त आहेत. तर, वन्यजीव विर्भातगातील १९ पदे असल्याने वनविर्भातगाच्या कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. परिणामी वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.काही वर्षांपासून आयएफएस लॉबी राज्य वनसेवेतील पदोन्नतीबाबत बैठक घेत नसल्याने वन विभागात रिक्त पदांचा आलेख वाढत आहे. वन विभागातील वनपरिक्षेत्राधिकारी हे पद अत्ंयत महत्त्वाचे आणि कार्यकारी पद असताना या पदाला न्याय मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे आयएफएस लॉबी स्तरावरून पदोन्नतीसाठी वर्षभरात बैठकी घेऊन रिक्त पदे राहणार नाहीत, याची दक्षता घेताना दिसून येत नाही. बदली धोरणानुसार अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांनी बदलीस पात्र १७९ आरएफओंची यादी तयार करून वनमंत्री संजय राठोड यांना सादर केलेली आहे. दुसरीकडे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची १५२ पदे रिक्त असताना ही पदे त्वरित भरण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नसल्याचे वास्तव आहे. आरएफओंच्या रिक्त पदांमध्ये विदर्भात सर्वाधिक जागा आहेत. वन्यजीव विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे ठेवण्यात आले असून, वन्यजीवांचे संरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमरावती वनवृत्तात सप्टेंबर २०१९ नंतर १६ वनपालांना आरएफओपदी बढती मिळाली. त्यानंतर मुख्य वनसंरक्षकांनी गत आठ महिन्यांपासून वनपालांची पदे रिक्त ठेवल्याची माहिती आहे.विभागनिहाय रिक्त पदेनागपूर- ३३, अमरावती - २६, औरंगाबाद- १७, नाशिक- २५, कोकण- २१, पुणे - ३०बदलीसाठी १० पसंतीक्रमवनविभागात बदलीस पात्र अधिकाऱ्यांना १० जागांसाठी पसंतीक्रम ठेवण्यात आला आहे. यात वनविभाग (प्रादेशिक), वन्यजीव विर्भातग, सामाजिक वनीकरण व कार्य आयोजना, रोहयो अशा शाखेत प्रत्येकी तीन वर्षांनी बदलीचे धोरण आहे. यवतमाळ व नागपूर वनवृत्तात काही आरएफओ ४ वर्षांचा कालावधी पार करूनही त्याच ठिकाणी कायम आहेत.सहायक वनसंरक्षकांच्या बढतीला ब्रेकवनविभागात सहायक वनसंरक्षक हे पद विनाकामाचे पद मानले जाते. या पदावर काही वनाधिकरी विभागीय वनाधिकाऱ्यांयांच्या बढतीच्या मार्गावर आहेत. सहायक वनसंरक्षकांची ३४ पदे रिक्त असताना आरएफओ ते सहायक वनसंरक्षकपदाच्या बढतीसाठी अद्यापही समितीची बैठक झालेली नाही. आयएफएस लॉबीच्या संथ कारभारामुळे आरएफओ, एसीएफ यांना बढती मिळालेली नाही.

टॅग्स :forest departmentवनविभाग