शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

१५२ मोबाईल टॉवर्सच्या लहरींचा अभ्यास होणार

By admin | Updated: April 5, 2015 00:19 IST

मोबाईल लहरींचा माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा काही अभ्यासक करतात,..

केंद्राचा निर्णय : पुणे येथील आधारकर संशोधन संस्थेक डे जबाबदारीअमरावती : मोबाईल लहरींचा माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा काही अभ्यासक करतात, तर काही अभ्यासक हा दावा चुकीचा असल्याचे सांगतात. या गोंधळात मानवी शरीरावर लहरींमुळे नेमका कोणता त्रास होतो की नाही हे सांगता येत नाही. यामुळे विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने मोबाईल टॉवर्सच्या लहरींचा अभ्यास करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार अमरावती येथील १५२ मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या लहरींचा अभ्यास करण्याची जबाबदारी पुणे येथील आधारकर संशोधन संस्थेकडे सोपविली आहे.केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने मोबाईल टॉवर्स लहरींचा अभ्यास करण्यासाठी देशभारतील १६ संस्थांची अभ्यासासाठी निवड केली आहे. त्याकरिता १० कोटींचे अनुदानसुद्धा मंजूर केले आहे. राज्यातील मोबाईल टॉवर्सच्या लहरींचा अभ्यास पुणे येथील आधारकर संशोधन संस्था करणार असून मानवी आरोग्यावर परिणामाचे नेमके चित्र काय राहील? हे अहवालात सांगितले जाणार आहे. या संस्थांना अभ्यासासाठी विषय देण्यात आले आहे. यामध्ये कर्करोग, मेंदूवर होणारे परिणाम, जैवरसायन अभ्यास, पुनरुत्पादन पद्धती यांच्यावर होणाऱ्या परिणामातील फरक, यावरील उपाय आदी विषयांचा समावेश असणार आहे.२४ मोबाईल टॉवर्सना परवानगीअमरावती शहरात उभारण्यात आलेल्या १५२ मोबाईल टॉवर्सपैकी केवळ २४ मोबाईल टॉवर्स कंपन्यांनी महापालिका प्रशासनाकडे आवश्यक ती कागदपत्रे सादर करुन परवानगी घेतली आहे. उर्वरित १२८ मोबाईल टॉवर्स कंपन्यांनी बिनदिक्कतपणे टॉवर्स उभारुन व्यवसाय करण्याची शक्कल लढविली आहे. या प्रकारामुळे महापालिकेला लाखो रुपयांच्या उत्पन्नापासून वंचित राहावे लागले आहे.मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या लहरींचा अभ्यास केला जाणार असल्याबाबतचा शासन निर्णय प्राप्त झाला नाही. त्याअनुषंगाने काही निर्णय आल्यास तशी कार्यवाही केली जाईल. अनधिकृत मोबाईल टॉवर्सना अधिकृत करुन घेण्याची कारवाई केली जाणार असल्याचे संकेत आहेत.- सुरेंद्र कांबळे, एडीटीपी, महापालिका.