शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

१५ वर्षांत २३० शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: December 19, 2015 00:14 IST

वरुड तालुक्यात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. १५ वर्षांत २३० शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे जीवनयात्रा संपविली.

वरुड तालुक्यात दुष्काळाचे सावट : १६ महिला शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा संजय खासबागे वरुडवरुड तालुक्यात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. १५ वर्षांत २३० शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे जीवनयात्रा संपविली. यामध्ये १६ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. सततचा दुष्काळ आणि नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मुलांच्या पालणपोषणासह शिक्षण आणि विवाहाच्या जबाबदाऱ्या डोक्यावर आहेत तर बँका, सावकार आणि खासगी फायनान्स कंपन्यांच्या वसुलीचा तगादयाने त्रस्त होऊन अनेकांनी जीवनयात्रा संपविली. सन २००१ पासून तालुक्यात कर्जबाजारीपणा आणि उत्पादन हाती न आल्याने आर्थिक परिस्थिती ढासळल्याच्या कारणाने आत्महत्या केली. यामध्ये तालुक्यातील हातुर्णा, सांवगा, टेंभूरखेडा, अमडापूर, आमनेर, आलोडा, इत्तमगाव, उदापूर, उराड, एकदरा, करजगाव, काचुर्णा, काटी, कुंभीखेडा, कुरळी, खडका, खानापूर, गाडेगाव, घोराड, चांदस, चिंचरगव्हाण, जरुड, जामगाव (खडका), टेंभूरखेडा, ढगा, तिवसाघाट, धनोडी, नांदगाव, नागझिरी, पंढरी, पळसोना, पवनी, पांढरघाटी, पिंपळखुटा, पुसला, पेठ मांगरुळी, फत्तेपूर, बहादा, बेनोडा, बेसखेडा, भापकी, भेमडी, मलकापूर, मांगोना, मिलनपूर, मुसळखेडा, मोरचूंद, मोर्शीखुर्द, रवाळा, बारगांव, आलोडा, खडका, राजुराबाजार, लिंगा, लोणी, खानापूर, वंडली, वडाळा, वरुड, वाठोडा, वाडेगाव, वावरुळी, वेडापूर, शेंदूरजनाघाट, सांवगा, सुरळी, सावंगी येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आणि विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे चित्र आहे. १ जानेवारी २००१ ते १५ डिसेंबर २०१५ पर्यंत तब्बल २३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यामध्ये १६ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. अतिवृष्टी, गारपीट आणि नंतर कोरडा दुष्काळ याला शेतकरी कंटाळला होता. दुबार , तिबार पेरणी करूनही निसर्गाने साथ दिली नाही. उत्पादनात कमालीची घट झाली. उत्पादनाला हमीभाव मिळत नसल्याने लागवडीचा खर्च काढणेही दुरापास्त झाले. दुष्काळी परिस्थितीमध्ये तालुक्यात अतिवृष्टी, गारपिटीने पिके बुडाली. संत्रा बहर गळाला, मृग नक्षत्रामध्ये मृगाच्या पावसाने तब्बल दोन महिने दडी मारल्याने खरीप पेरणी लांबली. यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला. केवळ शेतीवर कुटुंबांचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलामुलींचे विवाह, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला. बँकांकडून घेतलेल्या कृषी कर्जाचा भरणा कसा करावा, सावकारांचे कर्ज कसे फेडायचे की, गहाणातील जमिनी सावकारालाच पचू द्यायच्या हा प्रश्न निर्माण झाला. शासनाने आदेश देऊनही कर्जाचे पुनर्गठन होत नसल्याने शेतकऱ्यांनी मरण जवळ केले. आता या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भविष्याचा प्रश्न कायम आहे. शासनाने या निदान या शेतकरी कुटुंबातील सदस्यांसाठी तरी आर्थिक मदतीची तरतूद करावी, अशी अपेक्षा आहे.