शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

१५ हजार प्रयोगशाळा कर्मचारी न्यायापासून वंचित

By admin | Updated: November 28, 2015 01:21 IST

सुधारित आकृतिबंध अहवालातील त्रुटी दूर करून अहवालात प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी समन्वय समितीने अहवाल तयार केला आहे.

अमरावतीत रविवारी विचारमंथन : राज्यातील पदाधिकाऱ्यांची राहणार उपस्थितीधामणगाव रेल्वे : सुधारित आकृतिबंध अहवालातील त्रुटी दूर करून अहवालात प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी समन्वय समितीने अहवाल तयार केला आहे. या अहवालाची अंमलबजावणी शासनाने अद्यापही केली नसल्यामुळे कधी न्याय मिळणार, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे़ दरम्यान, अमरावती येथे राज्यातील या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची विचारमंथन होणार आहे़गत शासनाने २३ आॅक्टोबर २०१३ रोजी अध्यादेश काढून राज्यातील १५ हजार प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविले आहे़ इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत ० ते ३०० पर्यंत एक प्रयोगशाळा परिचर असावा, ३०१ पासून प्रयोगशाळा सहायकपद असावे़ राज्यातील हे कर्मचारी तृतीय श्रेणीत मोडत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त ठरवू नये, ज्युनिअर विभागाला तीन विभागात दोन प्रयोगशाळा सहायक व एक प्रयोगशाळा परिचरांची गरज आहे़ चिपळूनकर व गोगटे समिती यांचा अहवाल विचारात घेऊन प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचे आॅनलाईन वेतन देण्यात यावे, अशी मागणी आहे़ मागील अनेक वर्षापासून राज्यातील प्रयोगशाळा कर्मचारी इमानेइतबारे आपले कर्तव्य बजावत असताना समितीतील काही सदस्यांना शासन पाठीशी घालून तब्बल १५ हजार कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत आहे़या कर्मचाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ शासन कधी न्याय देणार, असा सवाल या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे़ समन्वय समितीच्या बैठकीत राज्याचे शिक्षण आयुक्त हे अध्यक्ष आहेत तर या समितीत १२ सदस्य आहेत. या समितीच्या बैठकीला उपस्थित न राहता केवळ प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्काच्या मागणीला विरोध करणे चुकीचे आहे़ प्रयोगशाळा कर्मचारी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल, लिपीक यांना या सुधारित अहवालातून न्याय मिळणे गरजेचे आहे़ राज्य शासनाने त्वरित आपला अहवाल सादर करून प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रयोगशाळा कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव भरत जगताप यांनी केली आहे़ (तालुका प्रतिनिधी)