शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

कांद्याचे १५ लाख उपलब्ध, सोयाबीनचे १२ कोटी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:13 IST

बाजार समित्यांमध्ये बेभाव विकल्या गेलेल्या कांद्यासाठी १५ लाख एक हजार ८१४ रूपयांचे अनुदान जिल्ह्यास प्राप्त झाले आहे.

३८ हजार शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर : सहा लाख क्विंटलला मिळणार अनुदानलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बाजार समित्यांमध्ये बेभाव विकल्या गेलेल्या कांद्यासाठी १५ लाख एक हजार ८१४ रूपयांचे अनुदान जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. मात्र, ३८ हजार ७९१ शेतकऱ्यांच्या सहा लाख आठ हजार २८८ क्विंटल सोयाबीनसाठी आवश्यक असणारे १२ कोटी १६ लाख ५७ हजार ५२० रूपयांचे प्रस्ताव मंजूर असले तरी अनुदान अप्राप्त आहे. विदर्भाचे ‘कॅश क्राप’ असणाऱ्या सोयाबीनचे अनुदान उपलब्ध करण्यात शासन दुजाभाव करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.१ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत बाजार समितीमध्ये विक्री करण्यात आलेल्या सोयाबीनला प्रती क्विंटल २०० रूपये व २५ क्विंटल मर्यादेत अनुदान शासन देणार आहे. यासाठी जिल्ह्यातून साधारणपणे ४५ हजार ४७ प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयांना सादर झाले होते. या प्रस्तावांची तालुकास्तरावर सहाय्यक निबंधकाच्या अध्यक्षतेखाली समितीने आणि जिल्हा उपनिबंधकाच्या अध्यक्षतेखाली समितीने जिल्हास्तरावर पडताळणी केली. यामध्ये अमरावती, धामणगाव रेल्वे बाजार समितीचे प्रस्तावांची संख्या सर्वाधिक असल्याने या पडताळणीला वेळ लागला. जिल्हा उपनिबंधकांनी प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. येत्या आठवड्यात सोयाबीनचे अनुदान प्राप्त होण्याची शक्यता आहे.गतवर्षीच्या खरीपात सोयाबीनचे तीन लाख हेक्टरवर पेरणीक्षेत्र होते. तसेच सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे उत्पादकता देखील वाढली. मात्र हंगामात बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची जशी आवक वाढली तसा व्यापाऱ्यांनी भाव पाडला. अगदी दोन हजार रूपये प्रती क्विंटलप्रमाणे सोयाबीनची बेभाव खरेदी करण्यात आल्यामुळे उत्पादन खर्च देखील निघाला नाही. त्यामुळे शासनाने आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बाजार समित्यांमध्ये विक्री झालेल्या सोयाबीनला अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने हे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच अनुदान प्राप्त होणार आहे.कांदा अनुदान जमा करण्यास २० जुलै ‘डेडलाईन’जिल्हातील बाजार समित्यांमध्ये जुलै व आॅगस्ट २०१७ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी विक्री केली. त्या पात्र शेतकऱ्यांना प्रती व्किंटल १०० रूपयांच्या मर्यादेत २०० क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यात फक्त अमरावती बाजार समितीमध्ये या कालावधीत कांद्याची विक्री झाली होती. यासाठी पणन संचालक आनंद जोगदंड यांच्या आदेशाप्रमाणे अमरावती जिल्ह्यासाठी १५ लाख एक हजार ८१४ रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. २० आॅगस्टच्या पूर्वी हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. कांद्यासाठी नाशिक, लासलगाव भागालाच फायदा होत आहे. मात्र,विदर्भाचे मुख्य पीक असणाऱ्या सोयाबीनला डावलले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.