शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मानवाधिकार आयोगाच्या नावाने १५ लाखांनी गंडवले; तोतया पदाधिकाऱ्यांना अटक

By प्रदीप भाकरे | Updated: August 5, 2024 15:08 IST

Amravati : भामट्यांपासून सजग राहण्याचे आवाहन

प्रदीप भाकरे अमरावती: दिल्लीस्थित आंतराष्ट्रीय मानव अधिकार परिषदेचे पदाधिकारी असल्याची बतावणी करून चांदूररेल्वे येथील संजय ननोरे यांची तब्बल १५ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तोतया पदाधिकारी अनिल बन्सीलाल राठोड (रा. चांदुर रेल्वे) व संदीप दादाराव राठोड (रा. पोहरा बंदी) यांना अटक करण्यात आली आहे.           

संजय ऊर्फ बाळकृष्ण ननोरे यांची चांदूर रेल्वे हद्दीतील तुळजापुर शिवारात शेती आहे. त्यांच्या जमिनीवर आवादा कंपनीने सोलर प्रोजक्ट लावले असून, त्याचा मोबदला कंपनीकडून मिळणे बाकी होते. मोबदल्यावरून ननोरे व कंपनीत काही वाद सुरू होता. त्या दरम्यान ननोरे यांची आरोपी अनिल राठोड व संदीप राठोड यांच्याशी भेट झाली. त्यांनी स्वत:ची ओळख आंतरराष्ट्रिय मानव अधिकार परिषद, दिल्लीचे पदाधिकारी असल्याचे करुन दिली. कंपनीसोबत लढणे ननोरे यांना व्यक्तीश: शक्य होणार नाही, अशी खोटी बतावणी करून त्याकरिता त्यांचे शेत राहुल महाजन नावाच्या व्यक्तीस ७ लाख रुपयांमध्ये विक्री करण्यास भाग पाडले.

दरम्यान, कंपनीकडून तक्रारदार ननोरे यांच्या बँक खात्यात जमिनीच्या मोबदल्यापोटी २२ लाख रुपये आले असता अनिल राठोड व संदीप राठोड यांनी कंपनीकडून एकुण ३३ लाख रुपये मिळवून देतो, त्याकरिता आंतरराष्ट्रीय मानव अधिकार परिषद, दिल्लीच्या अध्यक्षांना पैसे पाठवावे लागतात, अशी खोटी बतावणी करून ननोरे यांच्याकडून १५ लाख रुपये घेऊन फसवणूक केली. आरोपींविरुध्द चांदुर रेल्वे येथे फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

असे आहे पोलिसांचे आवाहनआंतरराष्ट्रीय मानवाधिकार, राष्ट्रीय मानवाधिकार, राज्य मानवाधिकार आयोग यांचे नाव, बोधचिन्ह, खोटे ओळखपत्र, लेटरहेड याबाबींशी साधर्म्य ठेऊन काही उसम नागरिकांची फसवणूक करित असल्याचे या प्रकरणावरुन दिसून आले आहे. सबब, नागरिकांनी अशांवर विश्वास न ठेवता खोटी बतावणी करून धमकावणे किंवा एखादे प्रकरण मिटविण्याचे नावाखाली खंडणी घेण्याचा प्रकार करीत असल्यास तसेच केला असल्यास संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्याचे आवाहन स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख किरण वानखडे यांनी केले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीAmravatiअमरावती