वलगावातील मदरसा येथील घटना : २५ जणांनी केले होते जेवणअमरावती : वलगावातील हजरत मकतुला शाह बाबा यांच्या मदरसा येथील १५ बालकांना शनिवारी अन्नातून विषबाधा झाली. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आले. अब्दुल राजिक अब्दूल कयुम (१५, रा.बिसमील्लानगर), शेख रेहान अब्दुल अजीज (१३, रा.पठाण चौक), मोहम्मद तौसिफ अब्दुल रफिक (१६), सैय्यद शाहरूख सय्यद फारूख (१४, रा. मोर्शी) व मोहम्मद जबी मोहम्मद जाकीर (१७, रा.अचलपूर) असे विषबाधा झालेल्या बालकांची नावे आहेत. वलगावातील मदरसा येथे ३५ मुले शिक्षण घेत आहेत. शनिवारी दुपारी त्यापैकी २५ बालके चिलमछावणी येथील एका धार्मिक कार्यक्रमात जेवणाकरिता गेले होते. तेथून सर्व बालके पुन्हा वलगाव मदरशात परतल्यावर दुपारच्या सुमारास पाच बालकांना उलट्या व अतिसाराचा त्रास सुरु झाला. मदरसाचे सचिव अनिस मिर्झा यांच्यासह सदस्य अब्दूल शाह, नवाज हाजी साहेब, मोहम्मद जाकीर व अब्दुल रफिक यांनी पाचही बालकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सायंकाळी आणखी १० बालकांची प्रकृती बिघडल्याने त्यांनाही इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. वलगाव पोलिसांनी बालकांचे बयाण नोंदविले. एफडीएचे अधिकारी अन्नाचे नमुने घेण्याकरिता गेले होते. (प्रतिनिधी)सायंकाळी आणखी १० बालके दाखलविषबाधा झालेल्या पाच जणांना रविवारी सकाळी दाखल करण्यात आले तर सायंकाळी आणखी १० जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये सुमीर शाह रहिम शाह (१२), मोहम्मद परवेज अब्दुल जब्बार(१६), अफजल अरबाज अफजल मजीद (११), शकील शहा हकिम शाह (१२), अहमद दानिश अखतर (११), सोहेब खा रहमत खा (९), अब्दुल जब्बार अब्दुल गफ्फार (१३), मोहम्मद रशिद मोहम्मद शब्बीर (१५) व सय्यद शाकिद सय्यद वसीम (१०) या बालकांचा समावेश आहे. विषबाधा कशामुळे झाली याची आधी शहानिशा करू. अन्नातून विषबाधा झाली असल्यास अन्न नमुने गोळा करून ते नमुने प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी पाठविण्यात येईल. - मिलींद देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न)
१५ बालकांना विषबाधा
By admin | Updated: November 16, 2015 00:14 IST