शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत १४.७३ टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 19:56 IST

सर्वत्र पाणीटंचाईची झळ : बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांत ४.२२ टक्के पाणीसाठा

- संदीप मानकर

अमरावती :  पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघु असे एकूण ५०२ प्रकल्पांत सद्यस्थितीत १४.७३ टक्केच पाणीसाठा राहिल्याने शेकडो गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अजूनही दोन महिने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती अतिशय भीषण असून या प्रकल्पात ४.२२ टक्केच पाणीसाठा आहे. 

अमरावती जिल्ह्यातील ८५ प्रकल्पांत १८.५३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १२० प्रकल्पांत २०.५४ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील ४६ प्रकल्पांत १३.४० टक्के पाणीसाठा, वाशिम जिल्ह्यातील १४६ प्रकल्पांत ७.१८ टक्के पाणीसाठा, बुलडाणा जिल्ह्यातील १०५ प्रकल्पांत सर्वात कमी ४.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्याकारणाने चिंता वाढली आहे. यंदा अपेक्षित पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचीसुद्धा भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जलतज्ज्ञांनी वर्तविली आहे. ५०२ प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पीय पाणीसाठा हा ३२९६.१६ दलघमी आहे. पण आजचा उपयुक्त पाणीसाठा फक्त ४८५.६६ दलघमी आहे. 

नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती चिंताजनकअमरावती शहराला पाणीपुरवठा करणाºया अप्पर वर्धा प्रकल्पांत सध्या १७.१५ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात २५.६४ टक्के पाणीसाठा, अरुणावती प्रकल्पात १२.६९ टक्के, बेंबळा प्रकल्पात २१.६१ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात १४.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वान प्रकल्पात सर्वाधिक ३५.२५ टक्के पाणीसाठा, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ८.४३ टक्के,  खडकपूर्णा ० टक्के, पेनटाकळी प्रकल्प ० टक्के पाणीसाठा आहे. एकूण नऊ प्रकल्पांत सरासरी १६.७३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. पश्चिम विदर्भातील २४ मध्यम प्रकल्पात सरासरी १९.२६ टक्के पाणीसाठा आहे. ४६९ लघु प्रकल्पांत ९.२० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

 

विभागातील जिल्हानिहाय टक्केवारी    जिल्हा    प्रकल्प    यंदा ९ मे पर्यंतची    मागील वर्षी ९ मे            पाणीसाठा टक्केवारी    पर्यंतची टक्केवारी    अमरावती    ८५    १८.५३    ३२.१७    यवतमाळ    १२०    २०.५४    १२.३०    अकोला    ४६    १३.४०    १७.६५    वाशिम    १४६    ७.१८    ७.३०    बुलडाणा    १०५    ४.२२    ७.३९      एकूण    ५०२    १४.७३    १७.०८

टॅग्स :water shortageपाणीटंचाई