शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

१४५ शिक्षकांची पेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:55 IST

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत सहभागी न होणाऱ्या व चुकीची माहिती सादर करणाऱ्या जिल्हाभरातील १५४ शिक्षकांची बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान १४ शिक्षक बदलीपात्र असतानाही अर्ज न भरल्याने त्यांची बदली करून बडतर्फीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना दिले आहेत.

ठळक मुद्देसीईओंनी विचारला जाब : अर्ज न भरणाऱ्या १४ शिक्षकांचा बडतर्फीचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत सहभागी न होणाऱ्या व चुकीची माहिती सादर करणाऱ्या जिल्हाभरातील १५४ शिक्षकांची बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान १४ शिक्षक बदलीपात्र असतानाही अर्ज न भरल्याने त्यांची बदली करून बडतर्फीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना दिले आहेत.जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आॅनलाइन बदल्या पहिल्यांदाच राज्यस्तरावरून करण्यात आल्या. या प्रक्रियेत १५४ शिक्षकांच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार १८ जुलै रोजी सायन्स कोअर शाळेत सीईओ मनीषा खत्री, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.डी. तुरणकर, उपशिक्षणाधिकारी वामन बोलके आदींच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली. १४ शिक्षक बदलीस पात्र होते. परंतु, त्यांनी बदलीसंदर्भात अर्जच भरला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या १४ शिक्षकांच्या बदल्या व त्यानंतर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणार असल्याचे सुनावणीदरम्यान सीईओंनी स्पष्ट केले. याशिवाय अनेक शिक्षकांनी कार्यमुक्त झाल्यानंतर रजा टाकली. नव्या नियुक्तीच्या ठिकाणी ते अद्यापही रूजू झाले नाहीत. अशा सर्व शिक्षकांच्या रजा रद्द करण्याचे आदेश देत, तात्काळ रुजू होण्याचे आदेश सीईओंनी बजाविले आहेत. काहींनी वैद्यकीय रजेचा अर्ज टाकून रुजू होण्याचे टाळले.अशा शिक्षकांनी आठ दिवसांत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करायचे आहे. प्रमाणपत्र सादर न करणाºया शिक्षकांना मेडिकल बोर्डापुढे हजर केले जाईल. तथ्य न आढळल्यास त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित होईल. जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेत चुकीची माहिती भरणाºया जवळपास ३०० शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेला प्राप्त झाली होती. पडताळणीअंती यामध्ये १५४ शिक्षक प्राथमिक तपासणीत दोषी आढळून आले होते. त्यामुळे या शिक्षकांची सीईओंच्या आदेशावरू न सुनावणी ठेवण्यात आली होती. यात १४ शिक्षकांचे पितळ उघड झाले आहेत....तर गटशिक्षणाधिकाºयांवरही कारवाईशिक्षक बदलीप्रक्रियेत ज्या पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयाने शिक्षकांची बदलीसंदर्भात जिल्हा परिषदेला लेखी माहिती सादर केली नाही, अशा गटशिक्षणाधिकाºयांवर कारवाई करण्याचे फर्मान मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सोडले आहे.शिक्षक बदलीप्रक्रियेत पहिल्या टप्प्यात ६० शिक्षकांची सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर दुसºया टप्प्यात चुकीची माहिती भरणाºया १५४ जणांची सुनावणी घेतली. यात १४ शिक्षक दोषी आढळून आले. त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली जाईल.- मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद