शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात १.४५ लाखांचा चालान घोटाळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 22:12 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एक लाख ४५ हजार रूपयांचा चालान घोटाळा झाल्याची तक्रार कुलगुरूंकडे केली आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आहे.

ठळक मुद्देकुलगुरूंकडे तक्रार : माहितीच्या अधिकारातून कागदपत्र मागविले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एक लाख ४५ हजार रूपयांचा चालान घोटाळा झाल्याची तक्रार कुलगुरूंकडे केली आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील रमेश मंडळकर यांनी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना दिलेल्या निवेदनातून प्राचार्य एम.बी. भुसारी, परीक्षा संचालक व मूल्यमापन मंडळाचे संचालक जयंत वडते, वित्त व लेखाधिकारी शशीकांत आस्वले यांच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवले आहे. तक्रारीनुसार विद्यापीठात नियमानुसार माहे जुलै २०१७ मध्ये हिवाळी परीक्षा चे आवेदन नियमानुसार महाविद्यालयाकडे सादर केले आहे. यात चिखली येथील श्री. शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयाचे प्राचार्य एम.बी. भुसारी यांच्या स्वाक्षरीने विद्यापीठाचे पॉवर ज्योती खाते क्रमांक ३१३१२०४०९७२ चालानद्वारे चिखली येथील भारतीय स्टेट बँकेत पैशाचा भरणा केल्याचा खोटे दर्शवून कव्हरनोट पत्रासोबत विद्यापीठाकडे चालानप्रत वेगवेगळ्या रक्कमा पाठविण्यात आल्या आहेत. प्राचार्य भुसारी यांनी विद्यापीठाकडे पाठविलेल्या परीक्षा आवेदनपत्र, त्यासंबंधी लागणारी फी रक्कम विद्यापीठाकडे पाठविल्याचे भासवून पत्रव्यवहार केला आहे. ही माहिती माहितीच्या अधिकारातून गोळा करण्यात आली आहे. खरे तर प्राचार्य भुसारी यांनी कोणत्याही प्रकारची जमा, डिपॉझिट, पैशाचा भरणा प्रत्यक्षात केला नाही. तथापि ६९६ विद्यार्थ्यांचे परीक्षा फी ची किती रक्कम जमा झाली याची खातरजमा न करता खोट्या चालानवर विश्वास ठेऊन ६९६ विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे हिवाळी परीक्षा प्रवेशपत्र दिले आहे. विद्यापीठाचे आर्थिक नुकसानीचा हा प्रकार असून यातील दोषींवर कठोर शासन व्हावे, अन्यथा हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे देऊ, असे तक्रारीत मंडळकर यांनी म्हटले आहे.

संबंधित प्राचार्यांना बोलावले आहे. चालानची रक्कम जमा झाली अथवा नाही, हे मंगळवारी स्पष्ट होईल. याबाबत लेखाधिकाºयांसोबत चर्चा झाली आहे.- राजेश जयपूरकर,प्र-कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ