शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

१४ हजार जन्मदाखले संशयित ! एसडीओंच्या समितीद्वारे होणार पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:03 IST

Amravati : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश यंत्रणा लागली कामाला

गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जन्म आणि मृत्यू सुधारणा अधिनियम २०२३ अंतर्गत जिल्हाभरात आलेले १४३६७ दाखले संशयित ठरले आहे. या सर्व प्रमाणपत्रांची चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची एकसदस्यीय समिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आता गठित केली आहे. या समितीद्वारे बोगस कागदपत्रांच्या आधारे देण्यात आलेल्या प्रमाणपत्राचा पर्दाफाश होणार आहे.

जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आठ नागरिकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळविल्याने त्यांच्याविरुद्ध १२ फेब्रुवारीला एफआयआर नोंदविण्यात आला व त्यानंतर आता १७ फेब्रुवारीला सहा नागरिकांविरुद्ध अमरावतीच्या गाडगेनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याने गंभिरता वाढली आहे.बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांना काही तहसीलदारांद्वारे बनावट जन्म प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आल्याची तक्रार राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे झालेली आहे व याबाबत शासनाचे चौकशीचे पत्र प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी यांनी पहिले अंजनगाव सुर्जी येथे चार सदस्यीय समिती व त्यानंतर सातही उपविभागात एसडीओंच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती गठित केलेली आहे.

समितीद्वारे कामकाज सुरू करण्यात आले असून या सर्व प्रकरणात अर्जदारांनी जोडलेली शैक्षणिक कागदपत्रे (टीसी) पडताळणीचे काम शिक्षण विभागाद्वारे सुरू आहे. तर गावचौकशी अहवाल महसूलची यंत्रणा करीत आहे. यामध्ये सदोष प्रकरणात एफआयआर दाखल होतील. शिवाय प्रकरण कोणत्या तालुक्यातील नायब तहसीलदार व तहसीलदारांवर शेकणार, याची खमंग चर्चा जिल्ह्यात होत आहे. अन्य तालुक्यातही काही प्रकरणे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तहसीलदार प्राधिकृत, स्वाक्षरी नायब तहसीलदारांची

  • जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी १३ ऑक्टोबर २०१३ रोजी सुधारणा अधिनियमाद्वारे आदेश जारी करुन जिल्ह्यातील सर्व म्हणजे १४ तहसीलदार यांना जन्म किंवा मृत्यू प्रकरणातील कार्यवाहीसाठी प्राधिकृत केले होते. या प्राधिकृत अधिकाऱ्यांना त्यांचे प्राधिकृत अधिकार अधिनस्त म्हणजेच कनिष्ठ अधिकाऱ्यांना देता येत नाही. मात्र, अनेक तालुक्यात चक्क नायब तहसीलदारांना अधिकार दिल्याने घोळ झाल्याचा आरोप होत आहे.
  • बहुतेक तालुक्यांमध्ये दाखल बहुतेक प्रकरणांमध्ये गावनमुन्यांची तपासणीच प्रटाधिकृत अधिकाऱ्यांद्वारा झालेली नसल्याची बाब आता समोर आलेली आहे. अर्जदार ज्या भागातील रहिवाशी आहे. त्या भागातीळ वर्तमानपत्रात जाहीरनामा प्रसिद्ध न करता स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्याने प्रकरणे चर्चेत आलेली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

४४९३ अर्ज एकट्या अमरावती तालुक्यात प्राप्त आहेवर्षभरात जन्म दाखल्यांसाठी १४,४११ अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणातील कागदपत्रांच्या पडताळणीचे आव्हान आहे.

काय आहे २०२३ चा सुधारणा अधिनियम?जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) अधिनियम २०२३ अन्वये कलम १३ (३) मध्ये कोणताही जन्म किंवा मृत्यू याची माहिती निबंधकाला ती घडल्याचे एक वर्षानंतर दिली जाते, त्या जन्म किंवा मृत्यूची नोंद जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा जिल्हादंडाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील जन्म किंवा मृत्यूच्या अचूकतेबाबत तपासणी करेल व शुल्काचा भरणा केल्यानंतर प्राधिकृत केलेला कार्यकारी दंडाधिकारी यांनी तसे आदेश दिल्यानंतरच जन्म किंवा मृत्यूची नोंद करता येते. यासाठी सर्व तहसीदारांना प्राधिकृत करण्यात आले.

"जन्म व मृत्यू दाखल्यांच्या तपासणीसाठी जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक एसडीओ यांची एकसदस्यीय समिती गठित केली आहे. समितीचे कामकाज सुरू झालेले आहे."- अनिल भटकर, निवासी उपजिल्हाधिकारी.

टॅग्स :Amravatiअमरावती