शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

१४ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 22:05 IST

अमरावती व यवतमाळ या दोन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे.

ठळक मुद्देआमसभा : प्रवीण पोटेंसह सहकारी पतसंस्था पदाधिकाºयांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती व यवतमाळ या दोन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. पूर्वीच्या काळात गाई-म्हशीच्या दूध उत्पादनातून शेतकरी कुटुंबातील महिला पैशांची बचत करीत होत्या. ऐन अडचणीच्या वेळेस हा बचत केलेला पैसा कामी येत असे. कालांतराने शिक्षणासाठी व रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी लोक शहराकडे स्थलांतरित होऊ लागले. सततची नापिकी व निर्सगाचा लहरीपणा यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला. सर्व अडचणींवर मात करण्यासाठी शेतकºयांनी पूर्वीप्रमाणेच शेतीपूरक व्यवसाय करून आत्मनिर्भर व्हावे, असे संवेदनशील आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी केले.महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी अभियंता सहकारी पतसंस्था मर्या. अमरावती या संस्थेची ३१ वी वार्षिक आमसभा पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी या पतसंस्थेव्दारे जिल्ह्यातील १४ आत्महत्याग्रस्त शेतकºयांंच्या कुटुंबीयांना १० हजार रुपये मदतीचा धनादेश वितरीत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सुनील जगताप, महावितरण यवतमाळचे अधीक्षक अभियंता रामेश्वर माहुरे, महावितरण अमरावतीचे अधीक्षक अभियंता अनिल वाकोडे, महापारेषणचे अधीक्षक अभियंता प्रफुल्ल औघड, वाशिमचे अधीक्षक अभियंता कैशरीया, आम्ही सारे फॉउंडेशनचे शेतकरी नेते विजय विल्हेकर सर्व सदस्य उपस्थित होते.राज्य शासनाकडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. यावर्षी कर्जमाफी योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयाला १० हजारांची तातडीची मदत आणि दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येत आहे. शेतकºयांनी खचून न जाता इतर शेतीपूरक व्यवसाय करून आर्थिक सुबत्ता प्राप्त करावी. शेतीपूरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून गाई-म्हशीचे पालन करावे, असे ते म्हणाले.महावितरणच्या अभियंतांनी आत्महत्याग्रस्त व गोर-गरीब कुंटुंबातील तीन विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च भागवावा. होतकरु विद्यार्थ्यांना पुस्तकांचा संच व दोन गणवेशाचे जोड उपलब्ध करून दिल्यास आयुष्यात आपणसुध्दा समाजिक दायित्व पूर्ण केल्याची भावना निर्माण होईल, असे पोटे म्हणाले. समारंभात १० वी, १२ वी मध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या अभियंतांच्या पाल्यांचा व वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळालेल्या अभियंतांचे तसेच सेवानिवृत्त अभियंतांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात राजेंद्र ठाकरे यांनी पतसंस्थेचा लेखाजोखा वाचून दाखविला. कार्यक्रमाचे संचालन उज्वल गावंडे यांनी केले, तर आभार मोघे यांनी मानले.