शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१४ पंचायत समितीस्तरावर आता 'वॉर रूम'

By जितेंद्र दखने | Updated: May 16, 2024 18:26 IST

जिल्हा परिषद : मान्सूनपूर्व तयारीसाठी ॲक्शन प्लॅन

अमरावती : जिल्हाधिकारी यांनी नुकताच मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील जनेतेच्या सुरक्षेची जबाबदारी ही जिल्हा परिषदेची असल्याने झेडपी प्रशासन याकरिता सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील १४ पंचायत समिती स्तरावर नैसर्गिक आपत्ती आणि साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश प्रभारी सीईओ संतोष जोशी यांनी दिले आहे.

जिल्हाभरातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी नियमितपणे मुख्यालयी हजर राहण्याची सक्ती केली आहे. पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी यांच्या नियंत्रणात विस्तार अधिकारी (पंचायत) यांची नोडल अधिकारी नियुक्ती केली जाणार आहे. मान्सून पूर्व नियोजनाकरिता महत्वाचे विभागांना अर्लट करत ॲक्शन प्लॅन सीईओंनी तयार केला आहे. यामध्ये आरोग्य, बांधकाम, महीला व बालकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, ग्रामपंचायत विभाग, लघुसिंचन, ग्रामीण पाणी पुरवठा आदी विभागांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांचे मॅपींग करण्यात तेआले असून, या आरोग्य केंद्रात औषधीसाठा,अमृत आहार आणि अनुषंगिक व्यवस्था असल्याची खात्री करणे, आरोग्य केंद्र, इमारती धोकादायक असल्यास अथवा दुरुस्ती करणे गरजेचे असल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ बांधकाम विभागाला कळवणे, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर रुग्णवाहिका सुस्थितीत, इंधन व वाहन चालकासह उपलब्ध आहेत याची खात्री करणे. नागरिकांना पावसाळ्यात शेतशिवार करण घरामध्ये सर्पदंश झाल्यास प्राथमिक उपचाराची व्यवस्था व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करणे, याशिवाय उपलब्ध असल्या अधिकारी यांनी तालुकास्तरावर आपत्ती आणि साथरोगतरावर नैसर्गिक वॉररूम स्थापन केली जाणार आहे.कोट

मान्सूनपूर्व नियोजनाकरिता आमचे सर्व विभाग सज्ज आहे. महत्वाच्या सर्व विभागांना सूचना देत सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. पंचायत समिती स्तरावर वॉर रूमची स्थापना करून विस्तार अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केली जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व घडामोडींवर जिल्हास्तरावर लक्ष ठेवता येईल- संतोष जोशी, सीईओ, जिल्हा परिषद

टॅग्स :Amravatiअमरावती