शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा १४ कोविड केअर सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST

अमरावती, भातकुली तालुक्याचे कोविड सेंटर शहरातील व्हीएमव्ही तसेच वलगाव येथे सुरू केले आहे. याशिवाय अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, धारणी, चिखलदरा, तिवसा, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आदी तालुक्यांत नव्याने सेंटर सुरू केले आहेत. यासोबत तालुकास्तरावर समन्वय पथक नेमण्यात आले असून, आशांच्या माध्यमातून घरोघरी आजारी व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. 

ठळक मुद्देग्रामीण भागातही निर्बंध : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रूग्णांचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपययोजनांकरिता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची यंत्रणाही कामाला लागली आहे. कॉन्टॅक्स ट्रेसिंग तसेच डोअर टू डोअर आरोग्य तपासणी आदी उपाययोनजा राबविण्यात येत आहेत. अशातच मध्यंतरी बंद केलेली तालुक्यातील काेविड केअर सेंटर  पुन्हा सुरू करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.अमरावती, भातकुली तालुक्याचे कोविड सेंटर शहरातील व्हीएमव्ही तसेच वलगाव येथे सुरू केले आहे. याशिवाय अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, धारणी, चिखलदरा, तिवसा, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आदी तालुक्यांत नव्याने सेंटर सुरू केले आहेत. यासोबत तालुकास्तरावर समन्वय पथक नेमण्यात आले असून, आशांच्या माध्यमातून घरोघरी आजारी व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. लग्न समारंभातील उपस्थिती, मंगल कार्यालयात त्रिसूत्रीचा अवलंब न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. यापूर्वीच्या ग्राम दक्षता समित्याही कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती सीईओ अमोल येडगे यांनी दिली. होम आयसोलेशनची सुविधा ग्रामीण भागातसुद्धा आहे. मात्र, अनेकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने होम आयसोलेशनमधील रुग्णांकडून बंधपत्र लिहून घेण्यात येत असून, नियमांचे उल्लघंन केल्यास २५ हजार रुपयांचा दंड व फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे सीईओ अमोल येडगे यांनी सांगितले.

संशयित रुग्णांच्या चाचणीसाठी नवी चार केंद्रेअमरावती : महापालिका प्रशासनाने अमरावती, बडनेरा शहरात हायरिस्क व्यक्ती, संशयित रुग्णांच्या चाचणीसाठी नवी चार केंद्रे स्थापन केली आहेत. कोविड-१९ संसर्ग झालेल्या रुग्णांच्या सहवासात आणि संपर्कात आलेल्या हायरिस्क व्यक्तींच्या संशयित रुग्णांची रॅपिड ॲन्टिजेन, आरटी-पीसीआर चाचणीची स्थानिक नवाथे स्थित महापालिका आयसाेलेशन दवाखाना, नेहरू मैदान येथील महापालिका शाळा येथे व्यवस्था करण्यात आली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने नव्याने चार केंद्रे स्थापन केली आहेत.

ही आहेत चाचणी केंद्रेविलासनगर येथे महापालिका शाळा क्रमांक १७. नागपुरी गेट येथे महापालिका शाळा. बडनेरात पोलीस ठाण्यामागील महापालिका शाळा. दस्तुरनगर येथे विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या