लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना व्हायरसने जग हादरले असून, १३ देशांत संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. खबरदारी राखण्याच्या अनुषंगाने चीनमधून शहरात दाखल होणाºया व्यक्तींना १४ दिवस निरीक्षणात ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.सध्या कोरोना व्हायरसने जगभरात कहर केला आहे. चीनमधून प्रसारित झालेल्या या आजाराचे लोण भारतातही पसरण्याची भीत व्यक्त होत असून, खबरदारी बाळगण्याच्या उद्देशाने चीनमधून अमरावतीत येणाऱ्या संशयित रुग्णांची १४ दिवसापर्यंत जिल्हा सामान्य (इर्विन) रुग्णालयात वॉर्ड ९ मध्ये स्वतंत्र कक्षत तपासणी करण्याचे निर्देश आरोग्य विभागाकडून देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यातील नायडू इस्पितळात कोरोना व्हायरस संशयितांची तपासणी करण्यात येत आहे. प्रसार माध्यमांद्वारा जनजागृतीदेखील करण्यात येत आहे. शहरात असे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर उपचारार्थ सर्व सुविधायुक्त कक्ष केला आहे.चीनमधून सात जण परतलेचीनमधून अमरावती सात जण दाखल झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स श्यामसुंदर निकम यांना सूत्रांनी दिल्याचे ते 'लोकमत'शी बोलताना म्हणाले. याला सध्या १४ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला असून, अद्याप एकही संशयित रुग्ण आढळलेला नसल्याने जिल्ह्यात कोरोनाचा धोका नसल्याचे ते म्हणाले.
चीनमधून येणाऱ्यांवर १४ दिवस निगराणीचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:00 IST
सध्या कोरोना व्हायरसने जगभरात कहर केला आहे. चीनमधून प्रसारित झालेल्या या आजाराचे लोण भारतातही पसरण्याची भीत व्यक्त होत असून, खबरदारी बाळगण्याच्या उद्देशाने चीनमधून अमरावतीत येणाऱ्या संशयित रुग्णांची १४ दिवसापर्यंत जिल्हा सामान्य (इर्विन) रुग्णालयात वॉर्ड ९ मध्ये स्वतंत्र कक्षत तपासणी करण्याचे निर्देश आरोग्य विभागाकडून देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
चीनमधून येणाऱ्यांवर १४ दिवस निगराणीचे निर्देश
ठळक मुद्देइर्विनमध्ये स्वतंत्र कक्ष । ७ जानेवारीला परतले सात जण