शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

१३व्या वित्त आयोगाची डेडलाईन संपली

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

तेरावा वित्त आयोग राज्य शासनाने सन २०१० पासून जिल्हा परिषदेला लागू केला होता.

ब्रेक : अखर्चित निधी होणार शासनदरबारी जमाजितेंद्र दखने अमरावतीतेरावा वित्त आयोग राज्य शासनाने सन २०१० पासून जिल्हा परिषदेला लागू केला होता. आता या आयोगाची पाच वर्षांची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे अखर्चित निधी शासन दरबारी जमा केला जाणार आहे. १ जानेवारीपासून चौदावा केंद्रीय वित्त आयोग सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी अस्तित्वात येत आहे. त्यामुळे प्रशासनावर वरील दोन्ही वित्त आयोगाच्या प्रशासकीय कामाचा ताण वाढला आहे. १३ व्या वित्त आयोगात शिल्लक असलेली रक्कम खर्च करण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्याचबरोबर या निधीतूनच संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) योजनेचे पैसे देण्याचेही निर्देश दिले आहेत.१३ व्या वित्त आयोगाचा मिळणारा निधी ७० टक्के ग्रामपंचायत २० टक्के जिल्हा परिषद, १० टक्के पंचायत समिती स्तरावर खर्च करण्याचे निर्देश होते. याप्रमाणे जिल्हा परिषद प्रशासनाने तेराव्या वित्त आयोगातून विविध विकासकामे सन २०१० ते २०१५ अखेरपर्यंत केली आहे. यामधून जिल्ह्यात काही ठिकाणी कामे सुरू आहेत, काही कामे आटोपली आहेत. मात्र आतापर्यंत १३ व्या वित्त आयोगातून डिसेंबरपर्यंत एकूण खर्चातील जे रक्कम या कालावधीत खर्च केली नसल्यास तो निधी शासन दरबारी जमा केला जाईल. डिसेंबर महिन्यात या निधीमधील ३ कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च होण्याचे बाकी होते. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या आत हा निधी खर्च करण्याच्या हालचाली वाढल्या होत्या. मात्र अशा परिस्थितीत तेराव्या वित्त आयोगातील निधी खर्च न झाल्यास हा निधी शासन दरबारी जमा होऊ शकतो. मुदतवाढीची शक्यताअमरावती : या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे हा निधी कुठल्याही परिस्थिती परत जाणार नाही, याची खबरदारी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. यामुळे निधी परत जाणार नाही, याची शाश्वती आहे. १३व्या वित्त आयोगाला शासनाने सलग दोन वेळा मुदतवाढ दिली.