शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

लंडनमधील इस्टेटची बतावणी, १.३४ लाखांनी लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 16:16 IST

Amravati news लंडनमधील एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यातील रक्कम ट्रान्सफर करण्याच्या नावावर येथील एका ४५ वर्षीय इसमाची सुमारे १ लाख ३४ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

 अमरावती : लंडनमधील एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यातील रक्कम ट्रान्सफर करण्याच्या नावावर येथील एका ४५ वर्षीय इसमाची सुमारे १ लाख ३४ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अचलपूर पोलिसांनी २२ एप्रिल रोजी दुपारी अज्ञाताविरूद्ध भादंविचे कलम ४२० व आयटी अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल केला.

१ मार्च ते २४ मार्च दरम्यान हा प्रकार घडला. अचलपुरातील गुलाबबागजवळ राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीशी एका अनोळखी आरोपीने फेसबुकद्वारे चॅटिंग केली. संवादादरम्यान आरोपीने फिर्यादीचा व्हाट्सअ‍ॅप क्रमांक घेतला. अन्य एका आरोपीचा मोबाईल क्रमांक देऊन संवादात भर घातली. पुढे त्यांच्यात व्हॉट्सअ‍ॅप चॅटदेखील सुरू झाले. त्यादरम्यान लंडनमधील एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्या खात्यात वारसाहक्काने ८५ कोटी ६३ लाख रुपये आहेत, ती तुमच्या खात्यात ट्रान्सफर करतो, अशी बतावणी केली. मात्र, त्यासाठी काही आर्थिक सोपस्कार व बॅकिंग चार्ज म्हणून काही रक्कम खर्च करावी लागेल, असेही सांगितले. त्यादरम्यान आरोपीने फिर्यादीचा खाते क्रमांक घेतला. वारंवार पैशाची मागणी केली. फिर्यादीने देखील विश्वास ठेवत तब्बल १ लाख ३४ हजार रुपये आरोपीच्या खात्यात ऑनलाईन भरणा केला. मात्र, फसवणूक होत असल्याची जाणीव त्यांना झाल्यानंतर त्या ४५ वर्षीय स्थानिकाने अचलपूर पोलिसांत धाव घेतली. अचलपूर पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध तक्रार नोंदवून घेत गुन्हा दाखल केला.

 

------------

टॅग्स :fraudधोकेबाजी