शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

१३२ केव्ही टॉवरलाईन पूर्णत्वाकडे

By admin | Updated: February 10, 2017 00:09 IST

मागील जानेवारी महिन्याच्या शेवटी उद्घाटनाच्या घोषणा केल्यानंतरही १३२ केव्ही टॉवर वीज लाईन न आल्याने नागरिक हैराण होते.

प्रतीक्षा संपणार : विजेचा प्रश्न लागणार मार्गी, नागरिकांना दिलासा धारणी : मागील जानेवारी महिन्याच्या शेवटी उद्घाटनाच्या घोषणा केल्यानंतरही १३२ केव्ही टॉवर वीज लाईन न आल्याने नागरिक हैराण होते. मात्र, आता ही टॉवर लाईन अंतिम चरणात पोहोचली असून ट्रांसफॉर्मर रिचार्ज करून टेस्टींगसाठी सज्ज झाल्याची माहिती आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी कोणत्याही परिस्थितीत हीसेवा मेळघाटातील जनतेपर्यंत पोहोचणार असल्याची ग्वाही ऊर्जामंत्री व त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यानी दिली आहे. मेळघाटात धारणी व चिखलदरा तालुक्यातील १७० गावे केवळ एकमात्र १९६० पासूनच्या ३३ केव्ही वीजपुरवठ्यावर अवलंबून होत्या. त्यामुळे अत्यंत कमी वीजदाब व १८ तासांच्या भारनियमनामुळे स्थानिक जनता वैतागून गेली होती. यासमस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना व्हावी यासाठी काँग्रेसचे तत्कालीन आमदार केवलराम काळे यांनी प्रयत्न केलेत. त्यांच्या कार्यकाळातच नेपानगर-जावरा-जुटपानी या महाराष्ट्र व मध्यप्रदेश आंतराज्यीय कराराद्वारे टॉवर लाईनचा सर्वे पूर्ण करण्यात आला होता. त्यानंतर आघाडी सरकार पायउतार होऊन युतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापित झाले. मेळघाटातही सत्तापरिवर्तन होऊन भाजपचे प्रभुदास भिलावेकर आमदार झाले. त्यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे १३२ केव्ही वीज लाईनचा पाठपुरावा करीत अनेकवेळा मध्यप्रदेशातील वीज कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यांशी भेटी घेऊन १३२ केव्ही लाईन लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले. शेवटी त्यांच्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून १३२ केव्ही लाईन आता पूर्णत्वास आली आहे.वीजजोडणी व १३२ केव्ही उपकेंद्राचे काम संपले असून एक-दोन दिवसात ट्रांसफॉर्मर रिचार्ज करण्यात येणार आहे. तर पुढील १५ दिवसांत ही सेवा मेळघाटातील ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असल्याची वार्ता कळताच शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता येथील विजेची समस्या कायमस्वरूपी सुटणार असल्याने नागरिकांना देखील दिलासा मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)