शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आयएमएच्या १,३०० डॉक्टरांचा संप

By admin | Updated: March 24, 2017 00:11 IST

धुळे येथील सर्वोपचार रूग्णालयातील आरएमओला रूग्णांच्या नातलगांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा

अमरावती : धुळे येथील सर्वोपचार रूग्णालयातील आरएमओला रूग्णांच्या नातलगांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करून इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्यावतीने वैद्यकीय सेवा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरातील रूग्णांचे हाल होत आहेत. मात्र, संपादरम्यानदेखील गंभीर रूग्णांना सेवा पुरविण्याचा निर्णय वैद्यकीय संघटनेने घेतला आहे. आयएमए संघटनेशी जुळलेल्या अंदाजे १,३०० खासगी डॉक्टरांनी त्यांच्या रूग्णालयांचा बाह्यरूग्ण विभाग (ओपीडी) बेमुदत बंद केली आहे. त्यामुळे गुरूवारी विविध आजारांवर उपचार करून घेण्यासाठी विविध रूग्णालयांमध्ये आलेल्या रूग्णांना आल्यापावली परतावे लागले. रूग्णांची यामुळे चांगलीच अडचण झाली.धुळ्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी व आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी आयएमए हॉलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक दुपारी ११ वाजता व सायंकाळी ६ वाजता पार पडली. यामध्ये मुंबई आयएमएच्या अध्यक्षांनी दिलेल्या गाईडलाईन्सनुसार चर्चा करण्यात आली. आयएमएचे अमरावतीचे अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष वसंत लुंगे, दिनेश साखरे, बी.आर.देशमुख, दिनेश वाघाडे, पंकज घुंडियाल, अलका कुथे, विजय कुथे, पी.आर.सोमवंशी, श्रीगोपाल राठी, दिनेश वाघाडे, नितीन राठी, आशिष साबू, गोपाल बेलोकार आदी उपस्थित होते. या आंदोलनाला केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन, डेन्टिस्ट असोसिएशने समर्थन जाहीर केले.शासकीय, निमशासकीय रुग्णालयाची सेवा सुरुशहरातील जिल्हा रुग्णालय (इर्विन), जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन), सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व पीडीएमसीची वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय आयएमएद्वारे घेण्यात आला आहे. याकरिता पीडीएमसीमध्ये एमबीबीएस व पीजीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी डॉक्टरांच्या आंदोलनासाठी एकवटले होते. गंभीर रुग्णांची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या बेमुदत बंददरम्यान रूग्णांना होणारा त्रास कमी होईल.