शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

१३० कोटींच्या नियोजनावर १० मिनिटांत शिक्कामाेर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:13 IST

(फोटो मेलवर झेडपी सभा नावाने आहे) अमरावती : जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत १३० कोटी रुपयांच्या जिल्हा नियोजन विकास ...

(फोटो मेलवर झेडपी सभा नावाने आहे)

अमरावती : जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत १३० कोटी रुपयांच्या जिल्हा नियोजन विकास आराखड्याच्या प्रस्तावावर १० मिनिटांत बहुमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे, आतापर्यंत निधीच्या मुद्यावर नेहमी आरडाओरडा होते. परंतु समन्वय ठेवून विकासकामे व निधी वितरणाचे नियोजन या सभेत करण्यात आले.

जिल्हा परिषदेला दरवर्षी विविध विकासकामांसाठी तसेच शासकीय योजनांकरिता जिल्हा नियोजन समितीकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील विकासकामांच्या नियोजनाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याचा नियोजन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार २० जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेत झालेल्या विशेष सभेत १०६ कोटी ७५ लक्ष १८ हजार रुपयांचा विकास आराखड्याचा प्रस्ताव पटलावर ठेवला होता. यात जनसुविधा योजनेसाठी ४ कोटी ५१ लाख, आयुर्वेदिक दवाखान्याचे बांधकाम ५२.५८ लाख, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम ३ कोटी १६ लाख, उपकेंद्र बांधकाम ४ कोटी ७४ लाख, अंगणवाडी बांधकाम ४ कोटी ९६ लाख, महिला व बाल कल्याणच्या योजनांकरिता ८२ लाख, कोल्हापुरी बंधाऱ्याकरिता ४ कोटी २० लाख, औषधी पुरठ्याकरिता ६० लाख, शाळा दुरुस्ती १३५७.३५ लाख, तर शाळा बांधकामाकरिता १३४३.२५ लाख रुपयांचे नियोजन केले आहे. तीर्थक्षेत्र विकासाकरिता ७ कोटी ७५ लाख, ग्रामीण रस्ते २६ कोटी, तर इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यासाठी १८ कोटी आणि आदिवासी उपयोजनेंतर्गत ४ कोटी ५० असे एकूण १०६ कोटी ७५ लाख रुपयांच्या नियोजनावर विशेष सभेत शिक्कामोर्तब झाले. याव्यक्तिरिक्त महिला व बालकल्याण, आरोग्य विभागासाठी अतिरक्त प्रत्येकी आठ कोटी व रस्ते विकासाकरिता ५ कोटी मिळून १३० कोटी रुपयांच्या नियोजन प्रस्तावास मंजुरी प्रदान केली आहे.

सभेचे अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, पूजा आमले, सदस्य प्रताप अभ्यंकर, रवींद्र मुंदे, महेंद्रसिंह गैलवार, जयंत देशमुख, नितीन गोंडाणे, सुनील डिके, सुहासिनी ढेपे, पूजा हाडोळे, वासंती मंगरोळे, सुरेश निमकर, प्रकाश साबळे यांच्यासह सीईओ तुकाराम टेकाळे, कॅफो चंद्रशेखर खंडारे व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

बॉक्स

ऑफलाईन सभेला लक्षणीय उपस्थिती

आठ महिन्यांनंतर २० जानेवारी रोजी झालेल्या विशेष सभा फिजिकल डिस्टन्सिंग पाळून ऑफलाईन घेण्यात आली. यात सर्वच सदस्य उपस्थित होते.

बॉक्स

प्रियंका दगडकर यांना श्रद्धांजली

जिल्हा परिषद बांधकाम व शिक्षण सभापती प्रियंका दगडकर यांचे निधन झाले. सभेत अध्यक्ष बबलू देशमुख यांनी शोकप्रस्ताव मांडला. यावेळी पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.