शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

सावधान! स्क्रब टायफसचे १३ पॉझिटिव्ह; आरोग्य यंत्रणा 'हाय अलर्ट'वर, ग्रामीण भागातही शिरकाव

By जितेंद्र दखने | Updated: September 20, 2022 17:56 IST

अमरावती जिल्ह्यात स्क्रब टायफसचे १३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

अमरावती : एकीकडे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा 'लम्पी'मुळे हाय अलर्ट मोडवर असताना जिल्ह्यात स्क्रब टायफसचे तब्बल १३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत आरोग्य विभागाने शहरासह जिल्ह्यातील ४८ नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यात १३ रुग्ण स्क्रब टायफस या आजाराने बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात शहरात ४ आणि ग्रामीण भागात ८ व १ रुग्ण बाहेरचा असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

याबाबत आरोग्य सेवा संचालनालयाचे आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा हिवताप अधिकारी यांना स्क्रब टायफस या आजारामध्ये करावयाचे कीटकशास्त्रीय सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना लेखी आदेशाद्वारे दिल्या आहेत. स्क्रब टायफस संसर्गाचा वाढता प्रकोप लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य यंत्रणा सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही भागात रुग्ण आढळल्यास त्या ठिकाणी तीन तासांत पोहोचून उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

असा होतो आजारट्रॉम्बिक्युलिड माइट्सचे लारव्हा ज्याला चिगर माइट्स म्हणतात. त्याच्यातील ओरिएन्शिया सुक्ष्म जंतूमुळे 'स्क्रब टायफस' होतो. गंभीर अवस्थेतील रुग्णांमध्ये ३० टक्केपर्यंत रुग्णांचा मृत्यू धोका असतो.

कुठे आढळतात किटकहे किटक गवत, शेत, जंगल, लॉन, तलाव, झरे आदी भागांत आढळतात.हे किटक लाल, शेंदरी, पिवळ्या रंगाचे असतात. पूर्ण वाढ झालेले कीटक चावा घेत नाहीत. लारव्हा स्वरूपात असलेले किटकच चावा घेतात.

पाच ते वीस दिवसांनी दिसतात लक्षणेकिटक चावल्यानंतर पाच ते वीस दिवसांनी रोगाची लक्षणे दिसायला लागतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणे, मळमळ, ओकाऱ्या आणि इतर तापाच्या रोगासारखी लक्षण असतात. त्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये मलेरिया, विषमज्वर किंवा डेंग्यू असण्याची शक्यता वर्तवली जाते. ज्या ठिकाणी चिगर चावतो त्या ठिकाणी एक व्रण असतो, ज्याला इशर म्हणतात. हा दिसला तर रोगनिदान नक्की झाले असे समजण्यात येते. परंतु ४० टक्के रुग्णांमध्ये हा इशर दिसत नाही. कपड्याने झाकलेल्या भागात तो असला तर दिसणआणखीच कठीण होतं. या आजारासाठी प्रतिबंधक लस नाही. लवकर निदान, लोकांचे जनजागरण, उंदरांवर नियंत्रण मिळवलं तर स्क्रब टायफस आटोक्यात येऊ शकतो.

सध्या स्क्रब टायफसचे रूग्ण आढळून येत असल्याने शेतात काम करत असताना पूर्ण अंगभर कपडे घालावे, झाडेझुडपे असलेल्या ठिकाणी काम करण्याचे टाळावे, ताप व अन्य लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या रूग्णालयात जावून उपचार घ्यावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांनी केले आहे. 

 

टॅग्स :AmravatiअमरावतीHigh Alertहाय अलर्ट