शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१३ कोटींचे स्वच्छता कंत्राट ३० कोटींत कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:37 IST

शहरातील दैनंदिन स्वच्छतेवर १३ ते १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना एकल कंत्राटाची किंमत ३० कोटी कशी, असा सवाल करत आ. रवि राणा यांनी मंगळवारी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.

ठळक मुद्देआ. राणा यांची विचारणा : प्रशासन अन् सत्ताधीशांचे वाभाडे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील दैनंदिन स्वच्छतेवर १३ ते १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना एकल कंत्राटाची किंमत ३० कोटी कशी, असा सवाल करत आ. रवि राणा यांनी मंगळवारी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. महापालिका आयुक्तांच्या दालनाशेजारी असलेल्या सभागृहात मॅरेथॉन बैठक घेऊन आ.राणा यांनी विविध प्रलंबित विषयांना हात घातला.बहुतांश उत्तरे सकारात्मक न आल्याने राणा यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी विविध अधिकाºयांचा क्लास घेऊन प्रशासकीय लेटलतिफी सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला. यावेळी महापालिकेच्या विधी सभापती सुमती ढोके, नगरसेविका सपना ठाकूर, आशिष गावंडे यांच्यासह युवा स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. मोठ्या कालावधीनंतर राणा यांनी महापालिकेत बैठक घेतल्याने तब्बल १८ विषयांवर घणाघाती चर्चा झाली. महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित असताना स्वच्छतेवर ३० कोटी रुपये खर्च करणे प्रशासनाला परवडेल काय? अन्य दायित्वाचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महापालिकेच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. ते खड्डे तातडीने दुरुस्त करावेत, मोकाट श्वानांचा प्रादुर्भाव रोखावा, डेंग्यू मलेरियाचा प्रकोप तातडीने रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही सूचना त्यांनी केली. महापालिकेच्या विविध रुग्णालयात औषधींचा अल्प साठा, रमाई घरकूल योजना, पंतप्रधान आवास योजना, राजापेठ ओव्हरब्रिज, भीमटेकडी सौंदर्यीकरण, रिलायंस कंपनीकडून झालेले खोदकाम, आॅटो डीसीआर प्रणाली, भुयारी गटार योजना, शहरातील अनधिकृत फलकबाजी, नेताजी चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा, ग्रीन स्पेस, अकोली बायपास, छत्री तलावाचे सौंदर्यीकरण आदी मुद्द्यांवर आ. राणा यांनी महापालिका आयुक्तांकडून माहिती घेतली. तसेच रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची सूचना केली. बैठकीला महापालिका अधिकाºयांसह एसटी, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ व अन्य विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.राणांच्या निवेदनात 'बीव्हीजी'चे नावस्वच्छतेच्या एकल कंत्राटासाठी १३ नोव्हेंबरला निविदा प्रक्रिया करण्यात आली. ही प्रक्रिया ११ डिसेंबरला संपुष्टात येऊन त्यानंतर पात्र निविदाधारक कंपनीचे नाव उघड होईल. मात्र आ.राणा यांनी मंगळवारी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात 'बीव्हीजी' या कंपनीचे नाव उघडपणे घेण्यात आले आहे. स्थायी समिती सभापती तुषार भारतीय याच कंपनीला समोर ठेवून एकल कंत्राट करीत असल्याचा आरोप करण्यात आला.सत्ताधीशांवर कोरडेअमरावती महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असली तरी प्रलंबित विषयांची संख्या अधिक आहे. महापालिकेत श्रेयाची लढाई सुरू असून तुषार भारतीय यांनी दावा केलेले १३६ कोटी रुपये कोठे आहेत, अशी विचारणा आ.राणा यांनी केली. तीन तास चाललेल्या मॅराथॉन बैठकीत त्यांनी प्रशासनासह भाजपवरही कोरडे ओढले.