शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१३ एकरांतील सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:05 IST

पेरणीनंतर पावसाने दिलेली दडी, नंतर अत्यल्प उगवण झालेले सोयाबीन व शेवटी अवकाळी पावसाचा कहर यामुळे हैराण केल्याने कापणीचाही खर्च निघण्याची शक्यता मावळल्याने कळमखार ....

ठळक मुद्देकापणीचाही खर्च निघत नसल्याने घेतला निर्णय : दीड लाख गेले पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : पेरणीनंतर पावसाने दिलेली दडी, नंतर अत्यल्प उगवण झालेले सोयाबीन व शेवटी अवकाळी पावसाचा कहर यामुळे हैराण केल्याने कापणीचाही खर्च निघण्याची शक्यता मावळल्याने कळमखार येथील जवरे बंधूंनी १३ एकर शेतातील सोयाबीन पिकावर ‘रोटाव्हेटर’ फिरविले. मेळघाटात एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची ही तालुक्यातील बहुदा पहिलीच घटना असावी.धारणी येथील विजय सोहनलाल जवरे व त्यांचे धाकटे बंधू गिरीश सोहनलाल जवरे यांच्या संयुक्त मालकीचे मौजा कळमखार येथे एकूण ५ हेक्टर ४५ आर शेत आहे. यावर्षी खरीप हंगामात जवरे बंधूंनी संपूर्ण मशागत करून पूर्ण शेतात सोयाबीनचा पेरा केला होता. मात्र, पेरणीनंतर पावसाने दगा दिला. यानंतरही काही प्रमाणात सोयाबीन उगवले. ते सोंगण्याच्या स्थितीत आले असतानाच अवकाळी पावसाने कहर केला. परिणामी सोयाबीन धुळीस मिळाले. त्यामुळे आता कापणीचाही खर्च निघणार नसल्याचे पाहून दोन्ही भावांनी मंगळवारी शेतावरील सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवून शेत साफ केले. या संपूर्ण १३ एकराच्या शेतावर एकूण अंदाजे दीड लाखांचा खर्च करण्यात आला. तो वाया गेल्याने जवरे बंधूंवर संकट ओढावले आहे. याची दखल घेऊन नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी जवरे बंधूंनी शासनाकडे केली आहे.कळमखार, धूळघाट, भोकरबर्डी, खापरखेडा यांंसह सर्व तालुक्यात यंदा खरीप हंगाम पावसाच्या लहरीवर वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.