शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
10
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
11
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
12
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
13
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
14
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
15
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
16
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
17
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
18
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
19
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
20
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार

१२,३८३ शेतकरी सावकारी पाशातून मुक्त

By admin | Updated: January 18, 2017 00:09 IST

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले सुमारे १७१ कोटींचे कर्ज राज्यशासनाकडून माफ करण्यात आलेत.

१२ जणांवर फौजदारी : २१.३७ कोटींचे गहाण सोडविलेप्रदीप भाकरे अमरावतीविदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले सुमारे १७१ कोटींचे कर्ज राज्यशासनाकडून माफ करण्यात आलेत. यायोजनेंतर्गत जिल्ह्यातील १२३८३ शेतकरी सावकारी कर्जातून मुक्त झाले आहेत. याकर्जदारांवर असलेले २१.३७ कोटींंच्या कर्जाची परतफेड राज्यशासनाने करून कर्जाची मुद्दल आणि त्यावरील व्याज संबंधित परवानाधारक सावकाराला परत केले आहे. दरम्यान जिल्ह्यात मागील वर्षभरात १२ सावकारांविरूद्ध फौजदारी आणि महाराष्ट्र सावकारी (नियमन)अध्यादेश २०१४ मधील कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.विधीमंडळाच्या सन २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत टंचाईसदृश परिस्थितीसंदर्भात चर्चा झाली. यावेळी विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले संपूर्ण कर्ज शासनामार्फत भरून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यानुसार १० एप्रिल २०१५ रोजी शासननिर्णय काढण्यात आला. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले १५६.११ कोटी कर्ज आणि त्यावरील १५.१९ कोटींचे व्याज शासनाकडून माफ करण्यात आल्याचे या शासननिर्णयात नमूद होते. त्याचवेळी योजनेतील लाभार्थींच्या पात्रतेचे निकष ठरविण्यात आले. कर्जदाराचे सावकाराकडे असलेले गहाण संबंधित कर्जदारास परत करून त्या गहाणावर घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज शासन सावकारास देऊन कर्जदार शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्त करण्याची ही योजना होती. योजनेच्या अंमलबजावणीसाठी ३१ मार्च २०१६ ही शेवटची तारीख देण्यात आली. परवानाधारक सावकाराने या मुदतीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या व व्याजाच्या तपशिलासह विहित नमुन्यात संबंधित तालुक्याच्या सहकारी संस्थेच्या उप वा सहायक निबंधकांकडे प्रस्ताव सादर करायचे होते. त्यानंतर त्या प्रस्तावाची छाननी करण्यात आली. कर्जमाफी प्रस्तावाला जिल्हास्तरिय समितीची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर सावकाराला देय असलेली रक्कम शासनामार्फत अदा करण्यात येणार होती. त्याअनुषंगाने सावकाराकडे तारण असलेली वस्तू वा मालमत्ता संबंधित शेतकऱ्याला परत करण्याबाबत सावकारास कळविण्यात आले, असे या योजनेचे एकंदर स्वरूप होते. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १२ तालुक्यातील १२३८३ कर्जदारांवर असलेले २१.३७ कोटी रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले.अर्थात ही रक्कम सावकारांना देण्यात आली.लंगोटे, कुबडेंविरुद्ध गुन्हा अमरावतीचे महादेव कुबडे आणि थुगाव पिंपरी येथिल राजेंद्र लंगोटे यांनी विहित मुदतीत कर्जदारांची यादी उपनिबंधकाकडे दिली नाही. त्यामुळे शेकडो कर्जदार कर्जमाफीपासून वंचित राहिले. दोघांविरुध्द सावकारी कर्जमाफी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. लंगोटे यांच्या विरुद्ध चांदूरबाजार पोलिसांनी भादंविचे कलम ४२०,४६७,४६८,४७१ ,४०९,१२० ब ,३४ सह महाराष्ट्र सावकारी अधिनियमातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ६ आॅगस्ट २०१६ रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. स्थावर मालमत्ता परत करण्याच्या ३ प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सावकारी (नियमन)कलम १८(२)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तर अवैध सावकारी प्रकरणात तालुकास्तरावर ७ सावकारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे खळबळ उडाली असून याप्रकरणातील दोषींवर काय कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण जिल्हाभराचे लक्ष लागून राहिले आहे.