अमरावती : पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात विविध ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर आयुक्तालयातील सुमारे १२५ कर्मचार्यांना सोमवारी पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संजय लाटकर यांनी पार पाडली. पोलीस आयुक्तालयाने पदोन्नती दिलेल्यांमध्ये पोलीस हवालदार पदावरुन सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर २२ जणांना बढती देण्यात आली आहे. यामध्ये अशोक रेवसकर, अरुण कोडापे, राजेंद्र गुलतकर, रमेश वानखडे, अ. सत्तार ताज मोहम्मद, किशोर आसरे, रवींद्र काळे, प्रवीण ढवळे, चंद्रकांत वानखडे, शेषराव सुने, सै. नरसुल्ला सै. रुमुमियॉ, संतोष भिसे, गजानन पुंडकर, गजानन थोरात, अविनाश नावरे, प्रकाश राठोड, मोहन सानप, रघुनाथ तिखिले, संजय पाचंगे, रामदास गंधे, अविनाश मेश्राम, कमलाकर राऊत आदींचा समावेश आहे. पोलीस नाईक पदावरुन पोलीस हवालदार पदावर ४१ कर्मचार्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये संजय कोहळे, मनोहर येवतकर, बंडू बर्डे, अरविंद महल्ले, अ. नबी शेख हबीब, सुधीर घुरडे, माधुरी साबळे, विजय हिवरे, हरिचंद्र इपर, प्रमोद पवार, सुरेश इंदोरे, जीवनलाल बांडे, राजेश सोनटक्के, संजय साबळे, पांडुरंग दंडारे, प्रदीप सावरकर, विनोद धोटे, हरिदास प्रधान, प्रकाश अंबाडकर, संजय गुलवाडे, पांडुरंग राऊत, मनिष करपे, संजय अदापुरे, सुधाकर गावंडे, विलास रामेकर, दिगंबर वाघमारे, प्रदीप नवलकर, विजय राठोड, सुरेश हिरुळकर, बाबा बनसोड, अ. आबीद शेख रसीद, शब्बीर अहमद खान, दत्तात्रय डिवरे, दिलीप श्रीनाथ, राजेश सपकाळ, अनुसया नांदणे, वैशाली सुज्रेकर, बाबाराव रायबोले, सुनील ढवळे, बलराम भाष्कर, अरविंद पवार आदींचा समावेश आहे. याशिवाय पोलीस शिपाई पदावरुन पोलीस नाईक पदावर ४३ कर्मचार्यांना बढती देण्यात आली आहे. यामध्ये पद्मावती ठाकरे, संजय जयसिंगकर, धर्मेद्र बारापाथरे, दादाराव मोढे, निलेश जुनघरे, मनिषा वानखडे, गणेश राऊत, संदीप देशमुख, चंद्रकांत जनबंधू, संजय जायभाये, भारतसिंग बघेल, दीपक सुंदरकर, विनोद राठोड, मनिष गहाणकर, सुरेखा ठाकरे, नवृत्ती भांगे, राजेश आगरकर, शंकर मुळे, विनोद माहुरे, शिवाली भारती, सचिन पवार, विनोद मिश्रा, अ. जाकीर अ. रऊफ, शरद धुर्वे, अरुण काळे, शिवकुमार कनोजे, संदीप देशमुख, अशोक बोरकुटे, दीपमाला धुरदये, अनिल निर्मळ, दीपक सराटे, दत्तात्रय ढोरे, संगिता महिंगे, जयमाला इंगळे, प्रकाश लांडगे, योगिनी तिडके, गजानन ढेवले, संगीता डकरे, रुपेश माहुरे, सुधीर कवाडे, भूषण कादरसे, रज्जाक शेकुवाले, रवींद्र चिखलकर आदींचा समावेश आहे. पोलीस शिपाई पदावरुन पोलीस नाईक पदावर १७ जणांना बढती देण्यात आली आहे. यामध्ये दीपक धोटे, सुभाष खंडारे, वंदना नागमोथे, शंकर आकडे, विनोद आमले, राजेंद्र पिंपळे, धैर्येशिल कुर्हेकर, विनोद इंगळे, गजानन सहारे, राजेंद्र ढाले, राजेंद्र राऊत, शंकर कास्देकर, राम बाखडे, सुभाष पारिसे, पंकज यादव, नितीन वानखडे, रवींद्र माहुरे आदींचा पदोन्नती दिलेल्यांमध्ये समावेश आहे. (प्रतिनिधी)
१२३ शहर पोलीस कर्मचार्यांना पदोन्नती
By admin | Updated: May 19, 2014 23:03 IST