शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

१२१४ प्रकरणे निकाली, साडेपाच कोटींच्या रोखीची तडजोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:06 IST

जिल्हा व सत्र न्यायालयात रविवारी पार पडलेल्या लोकअदालतमध्ये १ हजार २१४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून, ५ कोटी ५२ लाख ११ हजार ३५५ रुपयांची तडजोड करण्यात आली. नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन लोकअदालतचा लाभ घेतला.

ठळक मुद्देलोकअदालत : नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद; १० हजार दाखलपूर्व प्रकरणे, ३४ पॅनल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा व सत्र न्यायालयात रविवारी पार पडलेल्या लोकअदालतमध्ये १ हजार २१४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून, ५ कोटी ५२ लाख ११ हजार ३५५ रुपयांची तडजोड करण्यात आली. नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन लोकअदालतचा लाभ घेतला.लोकअदालतमध्ये १७ मार्च रोजी संपूर्ण जिल्ह्यातून १० हजार ७७४ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३३९ आणि ३ हजार ९५९ प्रलंबित प्रकरणांपैकी ८१५ अशा एकूण १२१४ प्रकरणांचा निपटारा ५ कोटी ५२ लाख ११ हजार ३५५ रुपयांच्या तडजोडीने करण्यात आला. यासर्व प्रकरणांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण एकूण ३४ मंडळ (पॅनल) तयार करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायाधीश, अधिवक्ता व कर्मचारी यांचा समावेश होता.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष ए.झेड. ख्वाजा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए.जी. संतानी यांच्या मार्गदर्शनात लोकअदालत यशस्वीरीत्या पार पडली.महिलेस दहा लाखांची नुकसानभरपाईमोटार वाहन कायद्यांतर्गत प्रलंबित प्रकरणे निकाली काढताना अर्जदाराचे वकील पी.बी. चौबे व ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी नरेश कंकारिया, अशोक नाईक तसेच अधिवक्ता नितीन बिजवे, पॅनल न्यायिक अधिकारी एफ.एम. ख्वाजा व अन्य सदस्यांच्या सुसंवादामुळे अर्जदारास नुकसानभरपाईचा लाभ मिळाला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.झेड. ख्वाजा यांच्या हस्ते अर्जदार जजिस्ता संदीप भोसले याला दहा लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला.या प्रकरणांचा समावेशमोटार अपघात नुकसानभरपाई प्रकरणे, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बॅकेचे प्रलंबित प्रकरणे, धनादेश न वटविल्याची प्रकरणे (निगोशिएबल इन्सटूमेंट अ‍ॅक्ट), भूसंपादन प्रकरणे, विवाहसंबंधी कायद्याचे दावे, बँकेचे तसेच दिवाणी व फौजदारी अपील व इतर दिवाणी प्रकरणांचे निपटारे लोकअदालतीत करण्यात आले आहेत.