शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

यूपीतील १२०० व्यक्ती लखनौकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:01 IST

पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते रेल्वे गाडीला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते. गुजरातेत बडोदा येथे ट्रेन सोडण्याबाबत नियोजन होत आहे. अडकलेल्या सर्व नागरिकांना स्वगृही पोहचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

ठळक मुद्देस्वगृही परतण्याचा आनंद : पालकमंत्र्यासह खासदारांनी दाखविली झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या १२३९ व्यक्तींना स्वगृही पोहचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्स्प्रेस शनिवारी सायंकाळी येथील रेल्वे स्थानकावरून लखनौकडे रवाना झाली. जिल्ह्यात अडकलेल्या इतरही नागरिकांना स्वगृही पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. संयम ठेवा, कुणीही पायी जाऊ नका, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते रेल्वे गाडीला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते. गुजरातेत बडोदा येथे ट्रेन सोडण्याबाबत नियोजन होत आहे. अडकलेल्या सर्व नागरिकांना स्वगृही पोहचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. रेल्वे स्थानकावर सर्व प्रवाशांंची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी योगदान दिले. प्रवाशांच्या चेहऱ्यावर घरी परतण्याचा आनंद दिसत होता. शासनाने दखल घेऊन विशेष ट्रेनची व्यवस्था केली याबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली. ट्रेन सुटताच प्रवाशांनी एकच जल्लोष केला.जिल्ह्यातून आतापर्यंत उत्तर प्रदेशात ३८६, भोपाळ ४, बिलासपूर ६९, तेलंगणा ४१४, आंध्र प्रदेश १६८, राजस्थान १५३, मध्य प्रदेश ३७६, चेन्नई ५, पश्चिम बंगाल येथील १५ व्यक्ती विशेष ट्रेनद्वारे रवाना झाल्या. कोटा येथून ७२ विद्यार्थ्यांना जिल्ह्यात परत आणण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.संकेतस्थळावर नोंदणीद्वारे जिल्ह्यात परतणे शक्यजिल्ह्यातून इतर राज्यात गेलेल्या या सर्व व्यक्तींना परत अमरावती जिल्ह्यात यावयाचे असल्यास त्यांना शासनाने विहित केलेल्या लिंकवर व संकेत स्थळावर आॅनलाइन अर्ज करावा लागेल. त्यानंतर त्यांना तेथील जिल्हा प्रशासनाद्वारा येण्याची परवानगी दिली जाईल. जिल्ह्यात परत येणाºया व्यक्तींची तालुका समितीमार्फत आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात व राज्यात परतलेल्या व्यक्तींसाठीदेखील हीच पद्धत राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या