शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

पहिल्या दिवशी 1200 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

केंद्र सरकारकडून बँकिंग ॲक्ट १९७०-१९८० या कायद्यात दुरुस्ती करून राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.  असे करताना बँक ग्राहक, ठेवीदार, भागधारक ,अर्थतज्ज्ञ, राजकीय पक्ष -संघटना या कुणालाही विश्वासात न घेता, त्यांचा विरोध डावलून सरकार हा देशहितविरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप युनायटेड फोरम ऑफ बॅक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गुरुवारी आणि शुक्रवारी  राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाच्या मुद्यावरून संप पुकारला आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतील सर्व कर्मचारी, अधिकारी दोन दिवसीय संपावर आहेत. परिणामी अमरावती जिल्ह्यात गुरुवार  आणि शुक्रवार या दोन दिवसात अंदाजे २४०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती आहे. या संपात अमरावती विभागातील ७०० अधिकारी व ९०० कर्मचारी सहभागी झाले आहेत.केंद्र सरकारकडून बँकिंग ॲक्ट १९७०-१९८० या कायद्यात दुरुस्ती करून राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.  असे करताना बँक ग्राहक, ठेवीदार, भागधारक ,अर्थतज्ज्ञ, राजकीय पक्ष -संघटना या कुणालाही विश्वासात न घेता, त्यांचा विरोध डावलून सरकार हा देशहितविरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप युनायटेड फोरम ऑफ बॅक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अमरावतीत एसबीआय बँकेसमोर गुरूवारी संपकऱ्यांनी निदर्शने करीत या धोरणाचा तीव्र विरोध केला. एसबीआय ऑफिसर असोसिएशन फोरमचे विभागीय अध्यक्ष मंगेश मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेट बँकिंग, कॅश डिपॉझिट मशीन, एटीएम आदी सुरू आहेत. तथापि, जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.

जिल्ह्यात दीडशे राष्ट्रीयीकृत बँकांचा सहभागकेंद्र शासनाच्या धोरणाविरोधात राष्ट्रीयीकृत बँकांनी पुकारलेल्या दोन दिवसीय संपात जिल्ह्यातील सुमारे दीडशे बँकेचे अधिकारी, कर्मचारी, शिपाई सहभागी झाले आहेत. ऑफलाईन कामकाज गुरुवारी पूर्णत: बंद होते. बँकेच्या परिसरात शुकशुकाट होता. मात्र ऑनलाईन कामकाज सुरू होते. येथील एसबीआयच्या कर्मचाऱ्यांनी बँकेसमोर निदर्शने करुन शासनाच्या धोरणांचा निषेध केला. अमरावती महानगरासह बडनेरा, तिवसा, मोर्शी, वरूड, अचलपूर, चिखलदरा, धारणी, धामणगाव रेल्वे, चांदूरबाजार, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, अचलपूर या तालुक्यांच्या ठिकाणी राष्ट्रीयीकृत बँकांचे ऑफलाईन कामकाज पूर्णत: ठप्प झाले होते.

 

टॅग्स :bankबँकStrikeसंप