शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

१२ रेशन दुकाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:38 IST

अचलपूर येथील तहसीलदारांनी केलेल्या तपासणीत तालुक्यातील १२ रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीनचा वापर न करता, धान्यवाटप केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे. रेशनचे हे धान्य कार्डधारक लाभार्थींना देण्यात आले किंवा नाही, याची तपासणी सुरू केल्याने काळाबाजार करणाऱ्या भ्रष्ट रेशन दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देअनियमितता भोवली : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर येथील तहसीलदारांनी केलेल्या तपासणीत तालुक्यातील १२ रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीनचा वापर न करता, धान्यवाटप केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे. रेशनचे हे धान्य कार्डधारक लाभार्थींना देण्यात आले किंवा नाही, याची तपासणी सुरू केल्याने काळाबाजार करणाऱ्या भ्रष्ट रेशन दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.शासनाच्या नवीन आदेशानुसार सर्व रेशन धान्य दुकानाचे कामकाज आॅनलाइन करण्यात आले आहे. कुटुंबप्रमुखाच्या बोटांच्या ठशांच्या आधारे रेशन दुकानातून धान्य घेतल्याची खात्री केली जाते. त्यानंतर संबंधित कार्डधारकाला रेशनचे धान्य दिले जाते. स्वस्त धान्य दुकानांमध्ये दुकानदार गोरगरिबांचे धान्य खुल्या बाजारात विकून भ्रष्टाचार करीत असल्याच्या शेकडो तक्रारीनंतर शासनाने आॅनलाइन मशीनचा वापर सुरू केला आहे.१०० टक्के आॅनलाइन थम्ब मशीनचा वापर करण्याचे आदेश असताना, तालुक्यातील सुमारे १२ दुकानदारांनी ५० टक्क््यांपेक्षा कमी प्रमाणात वापर केला असल्याचा ठपका निलंबित करण्यात आलेल्या रेशन धन्य दुकानदारांवर ठेवण्यात आला आहे.यांची झालीत दुकाने निलंबितअचलपूर तालुक्यातील असदपूर येथील सेवा सहकारी सोसायटी, परतवाडा येथील आर.आर. भगत, पांढरी येथील एम.एम. राजने, नरसिंगपूर येथील आर.डी. व्यवहारे, अचलपूरचे एच.ए. शहा, जी.बी. शिरस्कर, देवमाळी येथील एम.पी. शेरेकर आदींची दुकान परवाने निलंबित करण्यात आले.सतत केले आदेशाचे उल्लंघनतहसीलदार निर्भय जैन यांनी २ जून रोजी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविला होता. दुकानदारांना मार्च आणि एप्रिलचे धान्य २६ एप्रिल व २९ मे रोजी पोहोचते केले तरी ५० टक्क्यांपेक्षा कमी धान्य वितरण आढळून आले. जुलै महिन्यातसुद्धा तीच परिस्थिती होती. महाराष्ट्र अनुसूचित वस्तू अधिनियम १९७५ चे कलम १८ (२) अंतर्गत अटीचे उल्लंघन केल्यामुळे कायद्याच्या कलम ३ नुसार पुढील आदेशापर्यंत जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी कारवाई केली.कार्डधारक अन्य दुकानाला संलग्नकार्डधारकांची गैरसोय टाळण्याकरिता नजीकच्या रेशन दुकानांशी जोडण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले. रेशनचे धान्य कार्डधारकाला दिले गेले किंवा नाही, यासंदर्भात ५० टक्के कार्डधारकांचे बयान घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यात अपहार उघड झाल्यास फौजदारी कारवाईची शक्यता आहे.संबंधित दुकानदारांनी शासननियमानुसार ई-पॉस मशीनचा वापर न करता धान्यवाटप केले. सूचना देऊनसुद्धा अहवाल सादर केला नाही. तसा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकाºयांना पाठविल्यावर सात दुकाने निलंबित करण्यात आली आहेत.- निर्भय जैन, तहसीलदार