अमरावती : मागील वर्षी बाजार समित्यांमध्ये बेभाव विकल्या गेलेल्या सोयाबीनसाठी देण्यात येणारे १२ कोटींचे अनुदान ३१ आॅक्टोबरच्या आत वाटप करण्याचे निर्देश पणन विभागाने दिले; मात्र निधी उपलब्धच केला नाही. शासनच शासनादेशाचा अनादर करीत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने शुक्रवारी जनदरबारात मांडले असता, पणन विभागाने १२ कोटींचा निधी जिल्ह्यासाठी उपलब्ध केला. आता दोन दिवस बँकांना सुटी असल्याने पुढील आठवड्यातच हा निधी शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सहकार विभागाने सांगितले.मागील वर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बाजार समित्यांमध्ये बेभाव विकल्या गेलेल्या सोयाबीनसाठी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने १० जानेवारी २०१७ ला घेतला होता. हे अनुदान २६ आॅक्टोबरला उपलब्ध करून कुठल्याही परिस्थितीत ३१ आॅक्टोबरपूर्वी शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. वाटपाची ‘डेडलाइन’ संपली असताना जिल्हास्तरावर निधीच उपलब्ध झालेला नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले.जिल्ह्यातून ४५,०४७ प्रस्तावयावर एकच खळबळ उडाली. गेल्या हंगामात बाजार समित्यांमध्ये ३८ हजार ७९१ शेतकºयांचे ६ लाख ८ हजार २८८ क्विंटल सोयाबीन हमीपेक्षा कितीतरी कमी भावाने विकले गेले. यासाठी आवश्यक असणारे १२ कोटी १६ लाख ५७ हजार ५२० रुपयांचे प्रस्ताव आयुक्तस्तरावर मंजूर आहेत. मात्र वर्षभरापासून शासनाने अनुदान उपलब्ध केले नव्हते. १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत बाजार समितीमध्ये विक्री करण्यात आलेल्या सोयाबीनला प्रतिक्विंटल २०० रुपये व २५ क्विंटल मर्यादेत हे अनुदान शासन देणार आहे. यासाठी जिल्ह्यातून साधारणपणे ४५ हजार ४७ प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयांना सादर झालेले आहेत. गतवर्षीच्या खरिपात सोयाबीनचे पेरणीक्षेत्र तीन लाख हेक्टर होते तसेच सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे उत्पादकतादेखील वाढली. मात्र, हंगामात बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची जशी आवक वाढली तसा व्यापाºयांनी भाव पाडला. अगदी दोन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीनची खरेदी करण्यात आल्यामुळे उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. त्यामुळे शासनाने आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बाजार समित्यांमध्ये विक्री झालेल्या सोयाबीनला अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.सोयाबीन अनुदानासंबंधी १२ कोटींचे अनुदान प्राप्त झालेले आहे. पुढील दोन दिवस बँकांना सुट्या असल्याने प्रत्यक्षात सोमवारनंतर अनुदानवाटपाची प्रक्रिया सुरू होऊन आठवडाभरात वाटप होईल.- गौतम वालदे,जिल्हा उपनिबंधक
सोयाबीन अनुदानाचे १२ कोटी उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:00 IST
मागील वर्षी बाजार समित्यांमध्ये बेभाव विकल्या गेलेल्या सोयाबीनसाठी देण्यात येणारे १२ कोटींचे अनुदान ३१ आॅक्टोबरच्या आत वाटप करण्याचे निर्देश पणन विभागाने दिले....
सोयाबीन अनुदानाचे १२ कोटी उपलब्ध
ठळक मुद्दे३८ हजार शेतकºयांना न्यायसात दिवसांत होणार अनुदान जमा