शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘एनओसी’अभावी १२ कोटी परतीच्या मार्गावर

By admin | Updated: March 22, 2016 00:14 IST

जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अख्त्यारितील १८७ रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याकरिता जिल्हा परिषदेने ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) द्यावे,...

जितेंद्र दखने अमरावतीजिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अख्त्यारितील १८७ रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याकरिता जिल्हा परिषदेने ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) द्यावे, यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे हस्तांतरणाचा पेच कायम आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपत असल्याने १२ कोटींचा निधी परत जाणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात जिल्ह्यातील ४ हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे रस्ते येतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात जवळपास २ हजार ८०० किमीचे रस्ते आहेत. जिल्हा नियोजन समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते विकासासाठी सुमारे ४४८३.३२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विकास कामांसाठी रस्ते नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील १८७ रस्त्यांच्या कामांसाठी नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, याबाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला दिले आहे. पत्रानुसार जि.प.बांधकाम विभागाने हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी ठेवला. मात्र, नाहरकत प्रमाणपत्र देण्यास जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा नकार कायम आहे. जि.प.कडून या कामांसाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यास नियमसंगत पध्दतीने रस्ते दुरूस्ती, बांधकामाची कामे होऊ शकतात. परंतु राजकीय वादात ‘एनओसी’ देण्यास विरोध होत असताना दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने विनापरवानगी जि.प.च्या अख्त्यारीतील रस्त्यांची कामे सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एनओसीविनाच कामे सुरू झाल्याची चर्चाजिल्हा परिषदेने त्यांच्या अख्त्यारितील १८७ रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विकासकामांसाठी हस्तांतरित करण्याकरिता जिल्हा परिषदेने ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) द्यावे, यासाठी पाठपुरावा केला गेला. मात्र, यावर कुठलाही निर्णय झाला नाही. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाने एनओसीची वाट न पाहता कामे सुरू केल्याची चर्चा आहे. झेडपीच्या रस्त्यांची दुरूस्ती व विकास करण्यासाठी एनओसीबाबत उच्च न्यायालयाने वाशीम जि.प.ला दिलेल्या निर्णयानुसार विकासकामे करण्यासाठी विशेषाधिकार दिले आहेत. त्यानुसार ही विकासाची कामे मार्गी लावली जातील.- किरण गीत्ते, जिल्हाधिकारीपरवानगी न घेता जर जिल्हा परिषदेच्या अख्त्यारितील रस्त्यांवर विनापरवानगी कामे केली जात असतील किंवा विशेषाधिकार वापरून कामे केलीत तर आम्ही याविरोधात न्यायालयात दाद मागू.- सतीश उईके, अध्यक्ष, जिल्हा परिषद